मनमाड : ‘हिट अॅन्ड रन’ कायद्याविरोधात मध्यरात्रीपासून चालकांनी पुन्हा ‘स्टेअरिंग छोडो’ आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. यामुळे मनमाडच्या इंधन प्रकल्पात मध्यरात्रीपासून चालक फिरकलेच नाहीत.
त्यामुळे भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑइल व गॅस प्लँटमधील वाहतूक ठप्प झाली होती.
परंतु सायंकाळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार तसेच प्रांत बाबासाहेब गाढवे, तहसीलदार सिद्धार्थ मोरे तसेच पोलिस अधिकाऱ्यांसमवेत सकारात्मक चर्चा झाली.
सायंकाळी पाचनंतर चारही प्रकल्पांतील टँकरमध्ये इंधन भरणे पोलिस बंदोबस्तात अंशतः सुरू झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (Hit and Run Law Nashik Stop steering movement of fuel plant drivers Fuel filling stopped at midnight in Panewadi manmad)
नव्याने केलेल्या अपघात सुरक्षा कायद्यातून कायमस्वरूपी सुटका मिळवण्यासाठी पानेवाडीतील एक हजार ३०० इंधन टँकरचालकांनी ‘स्टेअरिंग छोडो’ आंदोलन मध्यरात्रीपासून सुरू केले होते.
त्यामुळे विदर्भ, मराठवाडा, उत्तर भारतासह येथून १३ जिल्ह्यांत होणारा डिझेल, पेट्रोल तसेच स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा ठप्प झाला होता. सकाळपासून एकही टँकर बाहेर न निघाल्यामुळे सुरवातीला हा संप चालकांनी केला असल्याचे सांगण्यात आले.
मात्र या संपास कोणत्याही संघटनेचे नेतृत्व नव्हते. केवळ सोशल मीडियातून आलेल्या बातम्यांतून चालक गाड्या भरण्यास आले नव्हते. आठ दिवसांपूर्वीही याच प्रश्नावर सुरू केलेला संप टँकरचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर दुसऱ्या दिवशी मागे घेतला.
परंतु या तोडग्याबाबत टँकरचे चालक समाधानी नसल्याने बुधवारी (ता. १०) पुन्हा संप झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, ‘स्टेरिंग छोडो’ आंदोलनामध्ये एका दिवसाकरिता शहरातील टॅक्सी चालकांनी सहभाग घेतल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ जानेवारीला नाशिक दौऱ्यावर येत असून, या कायद्याच्या फेरविचारासंबंधी चर्चेसाठी आम्हाला वेळ द्यावी व ‘हिट ॲन्ड रन’ कायद्याला ३१ मार्चपर्यंत दिलेल्या स्थगितीऐवजी तो कायदा पूर्णपणे मागे घेण्याची हमी द्यावी, असे काही टँकरचालकांनी बोलताना सांगितले.
टॅक्सी चालकांनी शहरातील मालेगाव चौफुली येथे कायद्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत आपला रोष व्यक्त केला. हा कायदा चालकांवर अन्यायकारक असून, हा कायदा तातडीने मागे घेण्यात यावी, अशी मागणीही टॅक्सी चालक संघटनेने केली.
"बुधवारी सायंकाळनंतर इंधन प्रकल्पातून पोलिस बंदोबस्तात विविध जिल्ह्यांमध्ये इंधन टँकर भरून रवाना होत आहे. "- नाना पाटील, अध्यक्ष, इंधन वाहतूकदार संघटना
"केंद्र सरकारने नव्याने केलेला अपघात सुरक्षा कायदा चालकांसाठी अन्यायकारक व जाचक असून, लवकरात लवकर हा कायदा मागे घेण्यात यावा तसेच चालकांना त्यांचे हक्क देण्यात यावे. "- रऊफ शेख, अध्यक्ष, टॅक्सी चालक संघटना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.