Nashik: कंत्राटी भरतीच्या शासन निर्णयाची होळी; येवल्यात NCPचे आंदोलन, राज्य शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी

NCP activists celebrating the government order of contract recruitment on Monday.
NCP activists celebrating the government order of contract recruitment on Monday.esakal
Updated on

येवला : युवकांच्या भविष्यातील शासकीय नोकरीच्या स्वप्नांचा चक्काचूर करणारा राज्य शासनाचा कंत्राटी भरतीचा निर्णय भविष्यासाठी घातक आहे. शासनाचा निर्णय युवकांचे आयुष्य उद्धवस्त करणारा आहे.

त्या निर्णयाच्या प्रतीची येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोमवारी (ता. १८) होळी करून निषेध करण्यात आला. (Holi of Govt Decision of Contract Recruitment NCP agitation in Yeola loud sloganeering against state government Nashik)

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. शाहू शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी विंचूर चौफुलीवर जमून प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर विंचूर चौफुलीवर येवला-नाशिक महामार्गावर जोरदार घोषणाबाजी करत कंत्राटी भरतीचा आदेश रद्द करा, अशा घोषणा देण्यात आल्या.

शासन निर्णयाच्या प्रतींची होळी करण्यात आली. कंत्राटी भरतीमुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवकांच्या स्वप्नांना लागाम बसणार आहे.

भविष्यात नोकरी दिवास्वप्न ठरणार असून, नऊ कंपन्यांच्या स्वाधीन शासकीय भरती करून ठराविक मानधन देण्याचा हा निर्णय अनेकांचे आयुष्य उद्धवस्त करणारा आहे किंबहुना यामुळे प्रगतीलाही खीळ बसणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

NCP activists celebrating the government order of contract recruitment on Monday.
11th Admission: अकरावी प्रवेशाची अखेरची संधी! इच्छुकांनी अर्ज भरण्याचे शिक्षण विभागाचे आवाहन

भांडवलदारधार्जिना हा निर्णय असल्याने शासनाने त्वरित निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी शाहू शिंदे यांनी केली.

शहराध्यक्ष योगेश सोनवणे, विधानसभा उपाध्यक्ष अजीज शेख, जिल्हा उपाध्यक्ष दीपक लाठे, तालुका उपाध्यक्ष भारत धनगे, अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष अकबर शहा, विद्यार्थी तालुकाध्यक्ष अमित शिंदे, साईनाथ मढवई, फिरोज शेख, मिलिंद पाटील, नीलेश भदाणे, कालू शेख, नारायण गायकवाड, बाळासाहेब कसबे, राजेश कदम, शंभू शिंदे, योगेश शिंदे, काका वाणी, माजित अन्सारी, संदेश शिंदे व कार्यकर्ते उपस्थित होते.

NCP activists celebrating the government order of contract recruitment on Monday.
Nashik News: निवडणुकांअभावी गणेशमंडळांचे अर्थकारण बिघडले; इच्छुकांची दमछाक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.