जुने नाशिक : हजरत इमाम हुसैन यांच्या पवित्र स्मृतिप्रीत्यर्थ मुस्लिम बांधवांकडून मंगळवारी (ता.९) विविध धार्मिक कार्यक्रमांनी आशूरा सण साजरा करण्यात आला. पारंपारिक हलोका ताजियासह विविध ठिकाणी स्थापना केलेल्या ताजिया आणि सवारीचे विधीवत विसर्जन करण्यात आले. पवित्र मोहरम पर्वाच्या दहाव्या दिवशी आशूराचा सण साजरा करण्यात येतो. (Holy Muharram Festival 10th day Celebrate Ashura festival with various religious events Nashik Latest Marathi News)
मंगळवारी आशुराची विशेष नमाज पठण करण्यात आली. त्यानंतर दुवा-ए-आशुराचे पठण झाले. काही मुस्लिम बांधवांकडून उपवास करण्यात आला. घरोघरी खिचडा, नियाज-ए- हुसैन आणि सरबत तयार करून फातेहा पठण करण्यात आले.
प्रसाद म्हणून त्याचे नागरिकांमध्ये वाटप करण्यात आले. दरम्यान, परंपरा असलेल्या ज्या मुस्लिम कुटुंबीयांकडून ताजिया, सवारीची स्थापना केली होती. त्या ताजिया आणि सावरीचे विसर्जन करण्यात आले.
आशूला अर्थात मंगळवारी हजरत इमाम शहा दर्गा परिसरातून तजियाचे विसर्जनापूर्वी खांदेकरीचा मान असलेल्या महादेव कोळी बांधवांकडून जागेवरच ताजियाची मिरवणूक काढत विसर्जन करण्यात आले. सर्व प्रकारचे निर्बंध शिथिल असल्याने या वर्षी यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
मोठ्या प्रमाणावर भाविक विशेषतः महिला भाविकांकडून ताजियाचे दर्शन घेऊन नवसपूर्ती करण्यात आली. यात्रेचा आनंद घेतला. भद्रकाली पोलिस ठाण्यातर्फे या ठिकाणी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मोहरम पर्वाच्या दहाव्या (आशुरा) च्या दिवशी गहू आणि विविध डाळींपासून खिचडा तयार करण्याची परंपरा आहे. त्याचप्रमाणे सरबतदेखील तयार केले जाते. बहुतांशी मुस्लिम कुटुंबीयांच्या घरी वर्षातून एकच वेळा अर्थात मोहरम पर्वात खिचडा तयार करण्यात येत असतो. त्यानिमित्ताने मुस्लिम बांधवांमध्ये त्याचे विशेष आकर्षण असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.