Nashik : घंटागाडी कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा; 2 तोळे सोन्याची पोत केली परत

owner of mangalsutra
owner of mangalsutraesakal
Updated on

नाशिक : घंटागाडीत कचरा टाकताना नजरचुकीने दोन तोळे सोन्याची गेलेली पोत घंटागाडी कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे परत केल्याने त्यांच्या या कामाचे कौतुक होत आहे. (Honesty of NMC Hourglass employees 20 gram gold mangalsutra returned to owner nashik Latest Marathi News)

owner of mangalsutra
Fire Accident : फटाक्यांची आतषबाजी अन् आगीच्या 5 घटना

पंचवटी विभागातील दिंडोरी रोडच्या कलानगरमध्ये शिवम अपार्टमेंटमध्ये वास्तव्य करणाऱ्या सविता राजेंद्र पवार यांनी दिवाळीनिमित्त लक्ष्मीपूजन झाल्यानंतर सकाळी देवघराची साफसफाई केली. त्यात फुलांच्या माळा आवरत असताना नजरचुकीने दोन तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र कचऱ्याच्या डब्यात गेले. घंटागाडीत कचरा टाकल्यानंतर सविता पवार यांच्या ही बाब लक्षात आली. कचऱ्यासोबत मंगळसूत्रदेखील गेल्याचे त्यांनी महापालिकेच्या सेवेत कार्यरत असलेले धनंजय सोनवणे यांना कळवले.

सोनवणे यांनी तनिष्क सर्व्हिसेस सुपरवायझर सुखदेव लोंढे यांना सांगितले. लोंढे यांनी या भागातील घंटागाडी (एमएच- १५- एफव्ही- १०५०) या गाडीवरील चालक भगीरथ सकट व कामगार सुनील भैरवा, ज्ञानेश्वर धोंगडे यांना सांगितले. त्यांनी कचरा वेगळा केल्यानंतर दोन तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र आढळून आले. सदर मंगळसूत्र सविता पवार यांना कर्मचाऱ्यांनी परत केले.

owner of mangalsutra
Nashik: ‘फिट्स’ च्या आजारावर केला जातो विनामूल्य उपचार; औषध घेण्यासाठी रूग्णांची गर्दी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()