नाशिक जिल्ह्यात सोशल मीडियावर हनी ट्रॅपचा धोका

honeytrap
honeytrapesakal
Updated on

नाशिक : सोशल मीडियाद्वारे (social media) जर तुम्हाला अनोळखी महिला चॅटिंग व व्हिडिओ कॉल करत असतील तर ते टाळा किंवा संपर्क टाळा. कारण नाशिकला महिलांचे प्रोफईल बनवून हनी ट्रॅपमध्ये (honey trap) लोकांना अडकविण्याचे काही प्रकार उघडकीस आले आहेत. कदाचित तुमचीही फसवणूक होऊ शकते. नेमका प्रकार काय? वाचा सविस्तर....(honey-trap-on-social-media-in-Nashik-district-marathi-news)

जिल्ह्यात सोशल मीडियावर हनी ट्रॅपचा धोका

नाशिकला महिलांचे प्रोफईल बनवून हनी ट्रॅपमध्ये लोकांना अडकविण्याचे काही प्रकार उघडकीस आले आहेत. लॉकडाउनच्या काळात ऑनलाइन फसवणुकीच्या घटना टाळण्यासाठी पोलिस अधीक्षकांनी पुढाकार घेत सोशल मीडियाचा वापर काळजीपूर्वक करण्याचे आवाहन केले आहे. नाशिक पोलिसांनी याबाबत जनजागृतीसाठी एक मोहीम हाती घेतली असून, त्याद्वारे लोकांनी काळजी व फसवणूक झाली असेल, तर तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. फसवणूक झालेल्या व्यक्तीची ओळख व नाव गोपनीय ठेवले जाईल. त्यामुळे न घाबरता तक्रार केल्यास यामागे असलेले मोठे रॅकेट उघड होऊन इतर लोकांची फसवणूक टाळता येऊ शकते.

सचिन पाटील : फसवणूक झालेल्यांनी तक्रारी करा

सोशल मीडियाद्वारे (social media) महिलांच्या बोगस प्रोफाईलद्वारे फसवणुकीच्या रॅकेटचा ग्रामीण पोलिसांना (nashik district police) संशय आहे. त्यामुळे अनोळखी महिलांशी चॅटिंग व व्हिडिओ कॉल टाळा किंवा संपर्क टाळा. तुमची कदाचित फसवणूक होऊ शकते. ग्रामीण भागात फसलेल्यांनी थेट पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले.

मोठ्या रॅकेटची शक्यता

सोशल मीडियाचे प्रत्येक ॲप अभ्यासून वापरणे व सतर्क राहणे गरजेचे आहे. व्हाॅट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम, डेटिंग ॲप आदींच्या माध्यमातून महिलांच्या नावाने बनावट अकाउंट तयार करून पुरुषांशी मैत्री झाल्यावर अश्लील चाळे करण्यास भाग पाडून त्याचा व्हिडिओ तयार करण्यात येतो व शेवटी अकाउंट हॅक करून धमकीद्वारे पैशाची मागणी केली जाते. शारीरिक लोभाचे आमिष दाखवून अनोळखी महिलेशी बोलताना कमालीची सतर्कता ठेवा. नाशिक पोलिसांनी यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. पीडित व्यक्तींनी समोर यावे.

honeytrap
कोविड रुग्णसेवा अखंडितपणे सुरू ठेवणार; हॉस्पिटल ओनर असोसिएशन

बहुतांश वेळा महिलेच्या नावाने पुरुष अकाउंट वापरतात व फसवणुकीच्या जाळ्यात अडकवतात. त्यामुळे असा प्रकार घडला असेल, तर निःसंकोचपणे जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी. -सचिन पाटील, पोलिस अधीक्षक

honeytrap
नाशिकमध्ये कोविड सेंटरवर होणार खासगी सुरक्षारक्षकांची नियुक्ती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.