वाडीवऱ्हे (जि. नाशिक) : शेतकरी आपल्या कुटुंबातील माणसावर जितके प्रेम असते, तितकेच प्रेम त्यांचे बैल, गाई, म्हशी, घोडा या पाळलेल्या प्राण्यांवर असते. शेतकरी त्यांच्यावर जिवापाड प्रेम करतो. अशाच एखाद्या प्राण्याचे निधन झाले तर त्याचा विधीवत दफनविधी केला जातो. अंत्यविधी, दशक्रिया विधी केला जातो. अशीच घटना कवडदरा येथे घडली. (Horse Funeral will held in Kavadadara Nashik News)
संदीप रोंगटे यांच्या राजा या घोड्याचे २४ आक्टोबरला मृत्यू झाला. त्यांनी त्याचा अंत्यविधी केला. २ नोव्हेंबरला कवडदरा येथे त्याचा दशक्रिया विधी आहे. त्यासाठी त्यांच्या कुटुंबातील किसन रोंगटे, पोलिस पाटील प्रकाश रोंगटे, सुभाष रोगटे, कैलास रोंगटे यांनी आपल्या आवडत्या घोड्याचे ऋण व्यक्त केले आहे. राजा घोड्याने अनेक टांगा शर्यतीत भाग घेऊन यश मिळवले होते. दशक्रिया निमित्त त्यांनी मनोहर घोडे यांचे प्रवचन ठेवले आहे. आपल्या घरातील व्यक्ती प्रमाणे विधी केले जात आहे. हा आगळावेगळा दशक्रिया विधी परिसरात चर्चेचा विषय झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.