Nashik News : एकेकाळचे दुर्लक्षित कुळीथ खातेय भाव! औषधी गुणधर्म असल्याने वाढली मागणी

Horsegram dal
Horsegram dalesakal
Updated on

देवळा (जि. नाशिक) : एके काळी अत्यंत दुर्लक्षित असलेले कडधान्य ‘कुळीथ’ सध्या सर्वाधिक भाव खात आहे. हलक्या जमिनीत येणारे कुळथाचे पीक फारसे कुणी करत नसले, तरी त्यास प्रतिकिलो १०० रुपये भाव मिळतोय. थंडीच्या दिवसात या कडधान्यापासून बनवलेल्या पदार्थांना मागणी वाढली आहे. (horsegram dal Increased demand due to medicinal properties Nashik News)

‘कुळीथले फुल येत नही अशी जमीन’ अशी एक म्हण प्रसिद्ध आहे. त्या जमिनीवर कुळीथसारखे सर्वात हलक्या प्रतीचे पीकसुद्धा पीकत नाही, असा त्याचा अर्थ. यावरून, इतर धान्यांच्या तुलनेत यापूर्वी कुळीथला हलका दर्जा दिला जात होता, ही बाब लक्षात येते. परंतु, अलीकडे कुळीथ कडधान्यात अनेक पोषक तत्वे आणि उपयुक्त वनस्पतीजन्य रसायने असल्याचे सिद्ध झाले आहे. या कडधान्यात लोह असल्याने थंडीत ते उष्णता वाढवते, ताकद देते.

त्यामुळे हिवाळ्यात तर कुळीथापासून बनवलेल्या पदार्थांना अधिक मागणी असते. कुळीथाचे शेंगोळे अर्थात्‌ कुळीथची जिलेबी, कढण, उसळ, पिठले यांना विशेष मागणी असते. लग्नसमारंभात बुफे जेवणात, तसेच शहरातील मोठमोठ्या हॉटेल्समध्ये असे पदार्थ आवर्जून केले जातात. नाशिकमध्ये नुकत्याच झालेल्या कृषी प्रदर्शनात या पदार्थांनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते.

कुळीथ पिकासाठी हलकी जमीनही चालते. पारंपारिक पिकांमध्ये कुळीथाचे उत्पादन फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे काही उपक्रमशील शेतकरी या पिकाला प्राधान्य देऊ लागले आहेत.

Horsegram dal
Nashik News: संगणक परिचालकांना कर्मचारी होण्याची प्रतिक्षा! अधिवेशनावर 27 डिसेंबरला निघणार मोर्चा

कुळीथाचे काही औषधी गुणधर्म

* कुळीथचे पदार्थ खाल्ल्याने वात व कफ कमी होतो

* खोकला, सर्दी, कफ यावर कुळीथचा वापर केला जातो

* कुळीथची भुकटी पाण्यासोबत घेतल्यास छातीतील कफ बाहेर पडण्यास मदत होते.

* कुळीथ रात्रभर पाण्यात भिजवून प्यायल्याने मुतखडा बाहेर घालविण्यास मदत होते. मूत्रपिंडाच्या कार्यात सुधारणा होते.

* शिजवलेल्या कुळीथची फोडणी ताकात देत तयार झालेले कढण वातनाशक असते.

* अंगावर पित्ताच्या गाठी आल्यास कुळीथाचे पीठ लावतात.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

Horsegram dal
Nashik News : शिवपुराण कथा सोहळा; भक्तीमय वातावरणातून पालटला मालेगावचा नूर!

"फास्टफूड खाऊन आजारांना निमंत्रण देण्यापेक्षा घरीच भरडधान्य व कडधान्य यांचा योग्य वापर केल्यास चव आणि पौष्टिकता दोन्ही मिळतील. त्यादृष्टीने विचार केल्यास आठवड्यातून किमान दोन ते तीनवेळा आपल्या आहारात कुळीथच्या पदार्थांचा आवर्जून समावेश करावा."

-डॉ. राजेंद्र गुंजाळ, देवळा

"मुळातच कुळीथचे उत्पादन अल्प मिळते. त्यामुळे शेतकरी या पिकाकडे दुर्लक्ष करतात. त्यात त्याच्या सुधारित वा संकरित जाती नाहीत. उत्पादन कमी आणि त्यात मागणी वाढल्याने भावात तेजी येणे स्वाभाविक आहे. यामुळे या पिकाने लक्ष वेधून घेतले आहे. योग्य मशागत करून आणि विशेष लक्ष देत उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावेत."

-बाळासाहेब देवरे, वाजगाव, सेंद्रिय धान्य उत्पादक शेतकरी

Horsegram dal
Nashik News: शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनविण्याचा निर्धार! पशुसंवर्धन विभागातर्फे Online नोंदणीची मोहीम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.