Nashik Fire Accident : म्हसरूळ शिवारातील म्हसोबा वाडीत शॉर्टसर्किटमुळे घराला लागली भीषण आग

Burned house
Burned houseesakal
Updated on

पंचवटी (जि. नाशिक) : म्हसरूळ शिवारातील म्हसोबावाडीत शॉर्ट सर्किटमुळे बुधवार (ता.२५) रोजी अकरा वाजेच्या दरम्यान आग लागल्याची घटना घडली. या आगीत एका कुटुंबाचा संपूर्ण संसार जळून खाक झाला असून बाजूच्या तीन घराचे देखील नुकसान झाले आहे.

आग विझवण्यात स्थानिकसह अग्निशामक दलास यश मिळाले असून मोठा अनर्थ टळला आहे. (house caught fire due to short circuit in Mhasoba Wadi in Mhasrul area Nashik Fire Accident news)

Burned house
Nashik Fire Accident : सिन्नरयेथील मुसळगाव औद्योगिक वसाहतीमधील साईटेक फार्मा कंपनीस शॉर्ट सर्किटमुळे आग

प्रभाग क्रमांक एक मधील म्हसरूळ शिवारात म्हसोबा वाडी आहे. या ठिकाणी जवळपास तीनशे ते पाचशे कुटुंब वास्तव्य करतात. या भागातील शेवटच्या गल्लीत बत्तीस वर्षीय विकास प्रकाश खरात आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहे. त्याचे कुटुंबात आई, बायको रमा, तीन मुले असे सर्व सदस्य आहेत.

सकाळी अकरा वाजेच्यां दरम्यान, त्याचे राहते घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. यांच्या आगीचा दाह वाढला अन् बाजूच्या तीन घरांना देखील त्याची झळ बसली. यावेळी आजू बाजूच्या नागरिकांनी घरातील भरून ठेवलेले सर्व पात्राचे पाणी टाकून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. काही सुजाण नागरिकांनी अग्निशामक दल व स्थानिक गॅस एजन्सीला खबर केली.

महाले गॅसचे दोन कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहचले त्या तीन घरांमधील गॅसच्या टाक्या सुरक्षित ठिकाणी हलविल्या . अग्निशामक दलाचा एक बंब पाचारण करण्यात आले होते, फायरमन संजय कानडे, नितीन म्हस्के, मंगेश पिंपळे, मनोहर गायकवाड, वाहनचालक बाळासाहेब काकडे होते. आग नियंत्रणात आणली असून मोठा अनर्थ टळला आहे.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

Burned house
Satara Crime News: जावळीत अवैध व्‍यावसायिकांचे धाबे दणाणले

"हे नागरीक ठरले तारणहार"

एरवी आजूबाजूला घटना घडली की मोबाईल धारक मंडळी मदत करण्याऐवजी फोटो व व्हिडिओ काढतात. परंतु म्हसोबावाडी मध्ये आग लागली त्यावेळी एकानेही फोटो व व्हिडिओ न काढता आजूबाजूच्या नागरिकांनी घरात पिण्यासाठी वापरण्यासाठी भरलेले पाणी घेऊन आग लागलेल्या ठिकाणी धाव घेत.

आग विझवण्याचा प्रयत्न केला. या मदत कार्यात सामाजिक कार्यकर्ता हिरामण गायकवाड, दिपक गोरडे, आतम पौल, रविंद तोडके, प्रकाश खरात, मिसाळ ताई, स्वप्नील गायकवाड, यश पवार अंकुश धोंगडे, गौरव मोरे, बेंडकळे ताई, रुक्मिणी गायकवाड, बन ताई आदी पुरुष व महिला असे स्थानिक अग्रेसर राहिले. या सर्वामुळेच मोठा अनर्थ टळला असून ते तारणहार ठरले आहेत.

Burned house
Best Bus Fire : मुंबईत मोठा अनर्थ टळला! वांद्रेमध्ये 'बेस्ट' भीषण आग

"स्थानिक गॅस एजन्सीची तत्परता"

म्हसरूळ भागात महाले गॅस एजन्सी चे कार्यालय आहे. म्हसोबावाडीत आग लागली याबाबत एका सुजाण नागरिकांनी त्यांना संपर्क केला, एजन्सी मालकाने ग्राहक कुठल्या एजन्सीचा आहे हे न बघता तात्काळ दोन कर्मचाऱ्यांना घटनास्थळावर पाचारण केले.

सदर कर्मचाऱ्यांनी स्थानिकांची मदत घेत, त्या आग लागलेल्या घरातील सिलेंडर बाहेर काढले व तपासणी करत ताब्यात घेतले. त्यातील एका सिलेंडरचे सिल जळाल्याचे निदर्शनास आले. यावर सदर सिलेंडर जमा करत नवीन वितरित करण्याचा निर्णय घेतला.

Burned house
Mumbai Fire : कुर्ल्यातील शिवाजी मंडईला आग; 25 दुकाने जाळून खाक

"संसाराला हातभार लावणार कशी "

विकास प्रकाश खरात हा मुळ परतूर, परभणी येथील असून जवळपास पांढरा ते वीस वर्षापासून म्हसोबा वाडी येथे राहतो. दिंडोरी रोडवरील एका कंपनीत नोकरी करतो. त्यांची बायको रमा विकास खरात शिवणकाम करीत होत्या. परंतु आगीत सर्व संसार उपयोगी वस्तू समवेत शिलाई मशिन देखील जळून खाक झाले आहे. रमा यांच्या पुढे आता मी माझ्या नवऱ्याला संसारात हातभार कसा लावीन असा प्रश्न त्यांना पडला आहे.

* विकास प्रकाश खरात यांचे घराला लागलेल्या आगीत सर्व जळून खाक

*शेजारील तीन घरांना देखील झळ

*त्याच्या घरातील कपडे कपात धान्य जळाले

Burned house
Fire Accident : वर्षभरात शहरात 404 आगीच्या घटना; खोडसाळपणा म्हणून केलेल्या 9 खोट्या घटना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.