Nashik Rain Damage : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शनिवारी (ता. १) दुपारी हनुमानवाडी परिसरातील जुने दुमजली घर कोसळल्याची घटना घडली.
स्थानिक तरुणांच्या प्रसंगावधानामुळे दोन महिला बालबाल बचावल्या. सुटीच्या दिवशीही मनपा विभागीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत भरपावसात मदतकार्य केल्याचे दिसून आले. (house collapsed in Hanumanwadi due to rain nashik news)
हनुमानवाडी येथील दळवी मार्गावरील चव्हाण चाळीत इंदुमती अशोक चव्हाण (६५) यांचे जुने दुमजली घर आहे. तळ मजल्यावर त्या, तर वरच्या मजल्यावर त्यांच्या नणंद सुलाबाई चव्हाण राहतात. या दोघी दुपारी घरात असताना पाऊस सुरू असताना घराचा एक भाग अचानक कोसळला. त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. घर कोसळल्याच्या मोठ्या आवाजाने आजूबाजूचे नागरिक मदतीसाठी धावले.
काहींनी मनपा अग्निशामक दलाला पाचारण केले. काही वेळातच पंचवटी केंद्रावरील बंब क्रमांक ४०२८ व संजय कानडे, शिवाजी मतवाड, बाळू काकडे, प्रकाश मोहिते व इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पंचवटी विभागीय अधिकारी योगेश रकटे, बांधकाम विभागाचे रामदास शिंदे व टीमही हजर झाली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
अग्निशामक व बांधकाम विभागाने भरपावसात रात्री उशिरापर्यंत मदतकार्य सुरू ठेवून घराचा संपूर्ण धोकादायक भाग उतरवून दिला. या घटनेत घरातील किमती वस्तूंचे मोठे नुकसान झाले.
घरातील सामान मातीच्या ढिगाऱ्यात दबल्या गेल्याने मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. रहिवासी शांताराम सानप, सतीश भंवर, हिंमत इंगळे, सागर पवार, प्रजय भंवर, भूषण इंगळे, यश येलमामे आदींनी तातडीने धाव घेऊन मदत केली. इंदुमती चव्हाण, सुलाबाई चव्हाण या अडकलेल्या होत्या. त्या पूर्ण भेदरलेल्या अवस्थेत होत्या. त्यांना धीर देत या नागरिकांनी जीव धोक्यात घालून त्यांना सुखरूपपणे बाहेर काढले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.