घराच्या किंमती वाढणार? सामान्यांच्या खिशाला लागणार कात्री

home
homeesakal
Updated on

मालेगाव (जि.नाशिक) : बांधकाम साहित्यांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे घरांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या बांधकाम क्षेत्राला दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने मुद्रांक शुल्कात डिसेंबरपर्यंत तीन टक्के, तर मार्च २०२१ पर्यंत दोन टक्के सवलत दिली होती. याचा अनेकांना फायदा झाला. (house-prices-will-rise-july-nashik-marathi-news)

घरांच्या किमतीदेखील जुलैपासून वाढणार

शासनालाही मोठ्या प्रमाणावर महसूल मिळाला. सध्या स्टॅम्प ड्यूटीबरोबरच सिमेंट, स्टील, मजुरी व इतर बांधकाम साहित्य दुपटीने वाढले. त्यामुळे बांधकामाचा खर्च वाढला आहे. परिणामी, घरांच्या किमतीदेखील जुलैपासून दोन टक्क्याने वाढणार असल्याचे बांधकाम व्यावसायिकांनी सांगितले. कोरोना व लॉकडाउनमुळे बांधकाम क्षेत्र आर्थिक संकटात सापडले आहे. सिमेंट, स्टील, मजुरी व इतर बांधकाम साहित्य महाग झाल्याने या उद्योगाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. पहिल्या लाटेनंतर बांधकाम उद्योगाला चालना देण्यासाठी शासनाने ३१ मार्च २०२१ पर्यंत मुद्रांक शुल्कात सवलत दिली होती. त्यामुळे मालेगाव व परिसरात घरांच्या किमतीत वाढ झाली. स्टॅम्प ड्यूटीच्या सवलतीची मुदत संपल्याने, तसेच बांधकाम साहित्याच्या किमतीत दुपटीने वाढ झाल्याने घरांच्या किमती वाढणार असल्याचे क्रेडाईच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

home
ऑक्सिजन, औषधे, बेडसंख्या वाढवा - मुख्य सचिव कुंटे
home
नाशिककर सुधरेनात! विक्रमी दंडवसुलीनंतरही रस्त्यांवर गर्दी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.