राज्यातील माजी सैनिक व सैनिकांच्या विधवा पत्नींना 'या' योजनेमुळे होणार लाभ!

sainik.jpg
sainik.jpg
Updated on

नाशिक : (मालेगाव) राज्यातील माजी सैनिक व सैनिकांच्या विधवा पत्नींना घराच्या मालमत्ता करात सूट देण्याचा महत्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता.13) विधानसभेत जाहीर केला. बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक व सैनिक विधवा पत्नींना मालमत्ता कर सूट योजना जाहीर करण्यात आली आहे. 

अडीच लाख माजी सैनिक व सैनिक विधवा पत्नींना लाभ होणार

राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे यांनी यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. या निर्णयाचा राज्यातील सुमारे अडीच लाख माजी सैनिक व सैनिक विधवा पत्नींना लाभ होणार आहे. श्री. भुसे यांच्याकडे माजी सैनिक कल्याण विभागाचा देखील पदभार आहे. विभागाच्या पहिल्याच आढावा बैठकीत त्यांनी माजी सैनिक व सैनिक विधवा पत्नी यांना मालमत्ता करातून सुट देण्याबाबत निर्णय घेतला होता. त्यानुसार बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक व सैनिक विधवा पत्नी यांना मालमत्ता करात सूट योजना लागू करण्याचा निर्णय वित्तमंत्री अजित पवार यांनी काल (ता.13) अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देतांना विधानसभेत जाहीर केला होता. 

या निर्णयानुसार शहरी व ग्रामीण भागातील सुमारे अडीच लाख माजी सैनिक व सैनिक विधवा पत्नींना मालमत्ता करातून सूट मिळणार आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका व महापालिका यांनी स्वच्छेने माजी सैनिक व सैनिक विधवा पत्नींच्या मालमत्ता कराचा भार स्वत: स्विकारावा व ज्या संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही त्यांच्यावरील आर्थिक भार ग्रामविकास व नगरविकास विभागामार्फत अदा करण्यात येणार असल्याचे श्री.भुसे यांनी सांगितले.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.