येसगाव (जि. नाशिक) : थंडीच्या दिवसात शरीराला उब आणि शक्ती देणारे पौष्टिक मेथीचे आणि डिंकाचे लाडू सामान्यांना हुडहुडी भरविणारेच आहेत. थंडीची चाहूल लागताच घराघरात गृहिणींची लाडू बनविण्याची लगबग सुरू होते. (Housewives flock to make methike laddu Winter Season Food nashik news)
हेमंत व शिशिर ऋतूला थंडीचा हंगाम मानतात. खाण्यात पौष्टिक पदार्थांचा वापर व्हावा म्हणून सुक्या मेव्याबरोबरच खारीक, खोबरे, मेथी, डिंक यांची लाडूंसाठी मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते. या पार्श्वभूमीवर बाजारात खरेदीसाठी रेलचेल सुरू झाली आहे. शहरी भागात तर रस्त्यावर व फेरी वाल्यांजवळ या वस्तू विक्रीसाठी आणतात. वरील वस्तूंच्या किमती वाढल्या असल्या तरी हे लाडू खाण्याची मजा हिवाळ्यातच असते. मध्यमवर्गीय व नोकरदार घरांमध्ये आवर्जून लाडू केले जातात. लाडूच्या वस्तूत पोषकमूल्य असतात.
महागाईमुळे मेथीचे लाडू सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. सध्या या वस्तूंचा बाजार गरम आहे. लाडू बनवण्यासाठी काही हजाराच्या पुढे रक्कम मोजावी लागत आहे. बाजारात काही कंपनीचे रेडीमेड लाडू विक्रीसाठी उपलब्ध असतात. परंतु, त्यांना पाहिजे तशी मागणी नसते. अशा लाडूंमध्ये कोणती वस्तू किती प्रमाणात आहे, याची शाश्वती नसते. घरच्या लाडूंवर गृहिणींना जास्त विश्वास असतो. त्यामुळे होममेड लाडूंकडे जास्त कल असतो. कुटुंबात लाडू बनविण्याचे वेध साधारणत: नोव्हेंबरपासून सुरू होतात.
First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने
सरासरी प्रतिकिलोचे दर
गुळ : ६० रुपये
काजू : १००० रुपये
बदाम : ८०० रुपये
खोबरे : १२० रुपये
खारीक : ४०० रुपये
डिंक : २०० रुपये
गोडंबी : १००० रुपये
मेथी : १५० रुपये
गावराण तूप : ७०० रुपये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.