Nashik News : 7 महिन्यात MPSCचा अभ्यास होणार कसा?; नवीन अभ्यासक्रम 2023 पासून लागू करण्यास विरोध

Student Protest reference
Student Protest referenceesakal
Updated on

बिजोरसे (जि. नाशिक) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ पासून वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला खरा; पण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना तो अडचणीचा ठरत असून, आयोगाने मराठीतून अभ्यासक्रम जाहीर केल्यापासून पूर्वपरीक्षेच्या अभ्यासाला ७, तर मुख्य परीक्षेला केवळ ११ महिन्याचा कालावधी मिळणार असल्याने विद्यार्थ्यांनी राज्य सेवेसारख्या काठीण्य पातळी असलेल्या परीक्षेचा अभ्यास इतक्या कमी दिवसात कसा करावा, असा प्रश्‍न उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे याविरोधात राज्यभरातील विद्यार्थी संघटना आता आक्रमक झाल्या आहेत. (How to study MPSC in 7 months Oppose of implementation of new curriculum from 2023 onwards Nashik Latest Marathi News)

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर मुख्य लेखी परीक्षेसाठी वर्णनात्मक पद्धत २०२३ पासून लागू केली जाणार आहे. स्पर्धा परीक्षार्थी किमान चार ते पाच वर्ष एमपीएससीचा अभ्यास करतात. याआधी मुख्य परीक्षा ही बहुपर्यायी पद्धतीने होत असल्याने त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांनी अभ्यास केला.

आता आयोगाने नवीन केलेला बदल चांगला असला तरी तो पुढील वर्षापासून लागू होणार असल्याने चार ते पाच वर्ष केलेल्या अभ्यासाचे काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. तेव्हा राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास ७ महिन्यात पूर्ण होणे शक्य नसल्याने या निर्णयाला प्रचंड विरोध होत आहे. समितीने २ मे २०२२ ला आपला अहवाल आयोगाला सादर केला. त्यानंतर २४ जून २०२२ ला अभ्यासक्रमात नवीन बदल करण्याचा निर्णय जाहीर झाला.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

Student Protest reference
Nashik Crime News : दुचाकी चोरट्याला 3 महिन्यांचा कारावास

त्यानंतर २० जुलै २०२२ ला इंग्रजी भाषेत, तर १७ ऑक्टोबर २०२२ ला मराठी भाषेतील अभ्यासक्रम सादर करण्यात आला. या नवीन अभ्यासक्रमानुसार पहिली परीक्षा ३ जून २०२३ ला, तर मुख्य परीक्षा ३० सप्टेंबर २०२३ ला होणार आहे.

"अभ्यासक्रम बदलाचा निर्णय मान्य असला तरी तो २०२३ पासून लागू करणे अन्याकारक आहे. त्यामुळे हा नवीन अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करावा."

- उमेश कोराम, अध्यक्ष, स्टुडंट राइट्स असोसिएट

"स्पर्धा परीक्षा देणारे अनेक विद्यार्थी हे वयोमर्यादेच्या काठावर आहेत. त्यांच्याकडे परीक्षेच्या केवळ एक ते दोनच संधी आहेत. मात्र, अचानक नवीन अभ्यासक्रमात बदल करण्यात आल्याने याचा फटका अशा विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता अधिक आहे."- डॉ. राहुल मोरे, नामपूर

Student Protest reference
Nashik Crime News : कांदा पिकावर अज्ञाताकडून फवारणी; शेतकऱ्याचे मोठे नुकसान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.