HSC Exam Result : आजाराशी दोन हात करत महाविद्यालयात प्रथम

madhura Gunjkar
madhura Gunjkaresakal
Updated on

HSC Exam Result : दहावीनंतर संधिवात आजारांवर जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मात करीत मधुरा संजय गुंजकर या विद्यार्थिनीने डे केअर ज्युनिअर कॉलेजमध्ये वाणिज्य इंग्रजी माध्यमाच्या शाखेतून ८४.१७ टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावला.

ती संधिवाताची रुग्ण असल्यामुळे चालणे तर दूरच जास्तीत जास्त तिचा वेळ बेडवर जात होता. (HSC Exam Result madhura gunjkar First in college after struggling with illness nashik news)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

madhura Gunjkar
Success Story : जिद्द, मेहनतीच्या बळावर मजुरांची मुले पोलिस खात्यात!

या परिस्थितीचा सामना करत अभ्यास आणि आजार यांचा समन्वय साधत तीने नेटाने अभ्यास चालू ठेवला. तिला पायांनी नीट चालता येत नसताना आणि हाताच्या बोटांनी पेन धरून नीट लिहिता येत नसतानाही तिने रायटर न वापरता बोर्डाचे पेपर लिहिले आणि घवघवीत यश संपादन केले.

शरीराला आलेल्या विकलांगतेचा कसलाही परिणाम मनावर होवु न देता स्वअध्ययनावर अधिकाधिक भर देवून तिने यश संपादन केले आहे. यात तिचे आईवडील, प्राध्यापक वर्ग व प्राचार्य यांचे मार्गदर्शन सहकार्य लाभले आहे.

बारावीनंतर सीए होण्याचा तिचा मानस आहे. संस्थेचे अध्यक्ष ॲड ल. जी. उगावकर, सचिव गोपाळ पाटील, सहसचिव ॲड. अंजली पाटील आणि प्राचार्य शरद गिते यांच्या उपस्थितीत तिचा गौरव करण्यात आला.

madhura Gunjkar
MPSC Success Story : ‘एमपीएससी’ परीक्षेत पातोंड्याच्या तरुणांची बाजी!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.