HSC Result : बारावीचा निकाल आज जाहीर झाला असून, जिल्ह्यात सर्वाधिक ९४.७१ टक्के निकाल पेठ तालुक्याचा लागला आहे तर ७९.९७ टक्के उत्तीर्णांची टक्केवारी असलेला कळवण सर्वात तळाला आहे. (HSC Result Peth taluka 12th result highest above 94 percent nashik news)
शिक्षण मंडळातर्फे गुरुवारी (ता.२५) ऑनलाइन पद्धतीने निकाल जाहीर झाला.दुर्गम, आदिवासी बहुल भागांमध्ये तुलनेत निकाल चांगला लागल्याचे आकडेवारीतून दिसून येते. नियमित व पुर्नपरीक्षार्थी असे नाशिक जिल्ह्यातून ४१ हजार ०४० मुले आणि ३३ हजार ५५७ मुली असे एकूण ७४ हजार ५९७ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला सामोरे गेले होते.
यातून ३५ हजार २४३ मुले आणि ३१ हजार १४७ मुली असे एकूण ६६ हजार ३९० विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांचे उत्तीर्णांचे प्रमाण ८५.८७ टक्के असून, मुलींचे उत्तीर्णांचे प्रमाण ९२.८१ टक्के आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
तालुका-------निकालाची टक्केवारी
चांदवड-----------८१.५०
दिंडोरी------------८९.८२
देवळा------------९२.१६
इगतपुरी---------८६.३२
कळवण----------७९.४५
मालेगाव---------९१.९७
नाशिक-----------८६.५७
निफाड-----------९३.९१
नांदगाव----------९४.४०
पेठ---------------९४.७१
सुरगाणा---------८६.५३
सटाणा----------९२.८२
सिन्नर----------८७.२३
त्र्यंबकेश्वर------९४.०५
येवला-----------९४.६४
मालेगाव मनपा---८४.६५
नाशिक मनपा-----८७.२३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.