HSC Success Story : मित्र- मैत्रीण आणि नातेवाईकांकडून उसनवारी घेतलेल्या पुस्तकातून महेक मंजि विद्यार्थिनीने बारावीच्या परीक्षेत यश प्राप्त केले. शिक्षणाची प्रबल इच्छाशक्ती आणि जिद्दीवर तिने वाणिज्य शाखेत ७४ टक्के गुण प्राप्त करून शाळेसह आई- वडिलांचे नाव उज्ज्वल केले. (HSC Success Story from rented books of mehek manji nashik news)
गुरुवारी (ता.२५) बारावीचे निकाल घोषित झाले. नॅशनल उर्दू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयातील महेक मंजि विद्यार्थिनीस हा दिवस तिच्या जीवनात नवीन दिशा देणारा ठरला. आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना तिने त्याचा परिणाम अभ्यासावर होऊ दिला नाही. तिचे यशाबद्दल शाळा प्रशासन, शिक्षक तसेच परिसरातील नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.
महेकचे वडील मिळेल त्याप्रमाणे पेंटिंग काम करतात. त्यांचे स्वास्थ बरोबर नसल्याने कधी कामही नसते. जितक्या दिवस काम केले जाते, त्यातून मिळणाऱ्या तुटपुंजा रकमेवर उदरनिर्वाह चालतो.
नाशिक रोड परिसरात राहत असल्याने तसेच भाड्याला पैसे नसल्याने दैनंदिन महाविद्यालयात येणे तिला शक्य होत नव्हते. असे असताना तिने काही दिवस महाविद्यालयात तर उर्वरित दिवस घरी अभ्यास करून यश मिळवले. हलाखीची परिस्थिती असल्याने पुस्तके घेणेदेखील शक्य नव्हते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
अशा वेळेस मित्र- मैत्रिणी आणि नातेवाइकांच्या शिक्षण पूर्ण झालेल्या मुलांकडून उसनवारी पुस्तके घेऊन तिने अभ्यास केल्याचेही सांगितले. त्यातच आईचेदेखील स्वास्थ बरोबर राहत नसल्याने बहिणीसह घरातील कामेही करावी लागत होती.
मोठी बहीण सध्या सीएचे शिक्षण घेत आहे. तर लहान बहीण चौथीच्या वर्गात शिकत आहे. प्रवेश घेण्यास पैसे नसल्याने मोठ्या बहिणीसदेखील सीएच्या अभ्यासक्रमातून काही काळ ब्रेक घ्यावा लागला होता. तिन्हीही परिस्थिती पुढे न झुकता पुढे शिक्षण चालू केले आहे.
तिचीच प्रेरणा घेऊन आणि आई-वडिलांच्या आशीर्वादाने तसेच शिक्षकांच्या मार्गदर्शनाने उच्च शिक्षण घेऊन कंपनी सेक्रेटरी बनण्याचा मानस तिने व्यक्त केला आहे. तिचा कलही सीए होण्याकडे आहे. परिस्थिती अभावी कंपनी सेक्रेटरीचे शिक्षण घेणार असल्याचे तिने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.