Sakal Exclusive : सावधान! येथे श्रमदान करायला येतात मृत मजुर...!

rojgar hami yojana
rojgar hami yojanaesakal
Updated on

Sakal Exclusive : रोजगार हमीच्या कामावर येवला तालुक्यात काही भागात प्रचंड अनियमितता झाल्याचे उघडकीस येत आहे.

मृत मजुरांची नावे हजेरी पटावर लावण्यापासून तर पुण्यात नोकरीला असलेल्या रोजगार हमीवर काम केल्याचे प्रकाराच्या तक्रारी आहेत. (Huge irregularities in some parts of Yeola taluka on employment guarantee work nashik news)

या संदर्भात ग्रामपंचायत सदस्याने थेट रोजगार हमी आयुक्तांकडे तक्रार केल्याने मोठाच भांडाफोड होण्याची शक्यता आहे.

पुरणगाव (ता. येवला जि.नाशिक) येथे शासनाच्या रोजगार हमी योजनेंतर्गत तानाजी ठोंबरे वस्ती ते उत्तम ठोंबरे वस्ती रस्ता खडीकरण कामासाठी एका मृत मजूर १ एप्रिल २२ ते ६ एप्रिल दरम्यान कामावर असल्याचे दाखविण्यात आले आहे. तसेच संबंधित मृत व्यक्तीच्या नावे १५९० रुपये मजुरीची रक्कम बँक ऑफ बडोदा जळगाव नेऊर शाखेच्या खात्यात जमा केल्याची तक्रार आहे.

ज्या व्यक्तीच्या नावाने ही मजुरी जमा झाल्याचे दाखविले तसेच हजेरीपटावर नोंद दाखविली आहे. त्या व्यक्तीचे तीन वर्षापूर्वी ३१ मे रोजी नाशिकला खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले आहे. मात्र ग्रामरोजगार सेवकांनी स्थानिक पुढाऱ्यांना हाताशी धरुन मृत व्यक्तीच्या कामावर मजूर म्हणून हजेरी दाखवत बँक ऑफ बडोदा जळगाव नेऊर या शाखेत मजुरी जमा केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

rojgar hami yojana
Nashik News : हौसला रखनेवाला, इमानदार सच्चा सैनिक हमने खोया

दरम्यान ज्या मृत व्यक्तीबाबत हा घोळ दिसतो आहे, ती मृत व्यक्ती सरपंचाचे नातेवाईक असल्याने बोट थेट सरपंचाकडे दाखविले जात आहे. केवळ कागदोपत्री मजुराची हजेरी दाखवून मशिनने हे काम उरकून रोजगार हमीच्या नियमांना हरताळ फासला गेल्याने गावातील ग्रामपंचायत सदस्याने थेट मंत्रालयात तक्रार केली आहे.

नोकरी पुण्यात हजेरी येवल्यात

या शिवाय गाडे वस्ती ते शिव रस्ता खडीकरण ग्रामपंचायत पुरणगाव या रस्त्यात अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याच्या तक्रारी आहेत. त्यात, पुण्यात खासगी नोकरीत असलेल्या एका युवकाला एप्रिल २०२२ मध्ये रोजगार हमीच्या कामावर हजेरीवर दाखविले आहे.

rojgar hami yojana
MHT CET Result 2023 : अखेर तारीख ठरली! एमएचटी- सीईटी परीक्षेचा निकाल या तारखेस होणार जाहीर

गाडे वस्ती ते शिव रस्ता खडीकरण ग्रामपंचायत पुरणगाव या रस्त्याच्या कामात २१ एप्रिल २०२२ ते २७ एप्रिल २२ दरम्यान रोजगार हमीच्या कामावर रोजंदारीवर दाखविलेल्या आणखी एक जण पुण्यात दुसऱ्या एका कंपनीत पूर्ण वेळ कामाला असल्याने अशा दोघांच्या पुण्यात काम करणाऱ्यांच्या नावावर येवला तालुक्यात रस्त्याच्या कामावर बोगसरीत्या मजूर म्हणून दाखवत रक्कम काढली गेल्याची तक्रार आहे.

"पुरणगाव येथील सदर रस्त्यांच्या कामांत अकुशल मजूर न वापरता पंचायत समिती गटविकास अधिकारी स्तरावर गैरव्यवहार झाला असून, शासनाची फसवणूक झाल्याने याविरोधात उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून तत्काळ गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत, ग्रामरोजगार सेवक यांच्या कामकाजाची चौकशी करीत कारवाईची गरज आहे." - रामनाथ ठोंबरे, ग्रामपंचायत सदस्य, जळगाव नेऊर, ता. येवला

rojgar hami yojana
Nashik News : सावधान...पाल्ये पोहण्यासाठी तर गेली नाहीत ना!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.