नाशिक : आईचे दूध नवजात बालकांना जीवनदायी असते. शिवाय जीवनदायी पोषक तत्त्वे प्रदान करते. मात्र, अनेकदा बाळाच्या जन्मावेळी मातेचा मृत्यू होणे, वेळेपूर्वीच अपूर्ण दिवसांची बालकांचा जन्म होणे किंवा काही गुंतागुंतीमुळे आईचे दूध अपुरे मिळते. त्यामुळे नवजात बालक अमृत देणाऱ्या दुधापासून वंचित असते. मात्र, आता ह्यूमन मिल्क बँकमुळे अशा नवजात बालकांची ही समस्या सुटणार असून, या बँकमुळे गरजू नवजात बालके सशक्त होणार आहेत, असे प्रतिपादन रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे प्रांतपाल रमेश मेहेर यांनी केले.
जिल्हा रुग्णालयात रोटरी वात्सल्य मातृ-दुग्ध पेढीचे मंगळवारी (ता. ३०) प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, एमएसएल ड्राइव्हलीन सिस्टिम लिमिटेडचे भूषण पटवर्धन, फॉक्स सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे जॉय अलूर, मायक्रोलॅबच्या डॉ. सपना शिंदे, डॉ. रूपाली राजदेव, एमपीजीआय सुहास पाटील, एमपीजीआय विद्यापीठाचे प्रमुख सुशिलकुमार झा आदी उपस्थित होते.
श्री. मेहेर म्हणाले, की जीवनाला आधार देणाऱ्या मातेच्या दुधाची गरज असलेल्या नवजात बालक आणि कुटुंबांना मदत करण्याच्या उद्देशाने रोटरीने पुढाकार घेत स्त्रीरोग आणि बालरोग तज्ज्ञ सदस्य आणि एक उच्च पात्र डॉक्टर अध्यक्ष म्हणून, रोटरी क्लब ऑफ नाशिकने नाशिकमध्ये अशीच एक मानवी दूध बँक स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यास सीएसआर योजनेंतर्गत एमएसएल ड्राइव्हलीन सिस्टिम लिमिटेड या कंपनीबरोबर सामंजस्य करार करून या रोटरी वात्सल्य मातृ-दुग्ध पेढी स्थापन करण्यात आली. त्यानंतर जिल्हा रुग्णालयाने या उपक्रमाला जागा उपलब्ध करून दिली. तसेच फॉक्स सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांनीही पुढाकार घेऊन मदत केली. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांना यश आल्याचे त्यांनी सांगितले.
रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या अध्यक्षा डॉ. श्रीया कुलकर्णी यांनी पेढीच्या सुरळीत कामासाठी काय-काय उपाययोजना करण्यात आल्याची माहिती दिली.
डॉ. पंकज गाजरे, माजी प्रांतपाल किशोर केडीया, महेश मोकळकर, निर्वाचित प्रांतपाल डॉ. आनंद झुनझुनवाला, आशा वेणुगोपाल, संजय कलंत्री, रवी महादेवकर, मुग्धा लेले, विनायक देवधर, मंगेश अपशंकर, प्रफुल्ल बरडीया, उदयराज पटवर्धन, मनीष चिंधडे, अनिल सुकेणकर, डॉ. हितेंद्र महाजन यांच्याह रोटरी क्लबचे पदाधिकारी, सभासद उपस्थित होते. डॉ. सूचेता मालवतकर यांनी आभार मानले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.