DPDC : सर्व्हर अडचणीनंतर शंभर टक्के निधी खर्च : डीपीडीसी

DIstrict Planning Committee
DIstrict Planning Committeeesakal
Updated on

नाशिक : यंदाच्या आर्थिक वर्षाच्या आजच्या अखेरच्या दिवशी नियोजन समितीच्या निधी खर्चात नंदुरबार व नाशिक जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. आज दुपारनंतर सर्व्हरला वारंवार प्रॉब्लेम येत असतानाही सायंकाळपर्यंत नाशिक विभागाचा प्राप्त निधी (९७.८२) १०० टक्के वितरित झाला होता.

रात्री उशिरापर्यंत शंभर टक्के निधी खर्ची पडेल, असे जिल्हा यंत्रणेचे प्रयत्न सुरू होते. जिल्हा नियोजनाचा निधी खर्चात मागील आर्थिक वर्षात पिछाडीवर असलेले उत्तर महाराष्ट्रातील जिल्हे यंदाच्या आर्थिक वर्षात आघाडीवर आहे.

प्राप्त निधी लक्षात घेता उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांनी १०० टक्के निधी खर्चाच्या दिशेने होते. (Hundred Percent Fund Expenditure After Server Trouble DPDC nashik news)

नियोजन समितीच्या निधी खर्चावरून नाशिक जिल्ह्याचे मागील आर्थिक वर्षात मोठीच नामुष्की झाली होती. राज्यात सर्वांत शेवट म्हणजे ३६ व्या क्रमांकावर नाशिक जिल्हा होता. मात्र यंदा एप्रिल महिन्यापासून नियमितपणे लक्ष केंद्रित जिल्हा प्रशासनाने निधी खर्चाचे नियोजन केले.

त्यात राज्यात सत्तांतर आणि पालकमंत्री बदल आणि खर्चावर मर्यादा येऊनही यंदाच्या आर्थिक वर्षात निधी खर्चात आघाडी टिकविली आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून नाशिक पहिल्या आठ ते दहा क्रमांकावर आहे.

आज दुपारपर्यंत ही आघाडी कायम होती. दुपारनंतर सर्व्हरला वारंवार अडचणी येत होत्या. त्यानंतरही निधी खर्चात नाशिक दुपारपर्यंत आठव्या स्थानावर, तर उत्तर महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर होते.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

DIstrict Planning Committee
Caste Validity : उमेदवारी अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता नाही; बाजार समितीच्या उमेदवारांना दिलासा

शंभर टक्के वितरण

नाशिक जिल्ह्याला मिळालेल्या निधीपैकी जिल्हा नियोजन समितीने दुपारपर्यंत ५९८ कोटी ४६ लाखांचा निधी (९९.६८ टक्के) विविध यंत्रणांना वितरित केला होता, तर त्यातील ५९३ कोटी चार लाखांचा निधी (९८.८४) टक्के खर्ची पडला होता.

एका बाजूला सर्व्हर डाउनच्या अडचणी येत असताना दुसरीकडे निधी खर्चाचे कामकाज जोरात सुरू होते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत यंदाच्या आर्थिक वर्षातील नियोजनानुसारचा १०० टक्के निधी खर्ची पडेल, असा विश्वास जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी यांनी व्यक्त केला.

DIstrict Planning Committee
Birds Migration : पाणवेलींमुळे अभयारण्यातून पक्ष्यांचे स्थलांतरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.