इंदिरानगर (जि. नाशिक) : रात्रभर सुरू असलेल्या तुफान अवकाळी पावसामुळे (Unseasonal rain) पाथर्डी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या शेकडो एकर जागेवरील द्राक्ष (Grapes) बागेचे आणि गव्हाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. (Hundreds of acres of farmers vineyards and wheat crops were severely damaged due to unseasonal rain nashik news)
पाथर्डी, पिंपळगाव खांब, दाढेगाव, पिंपळद आदी भागात सुमारे दोनशे एकर द्राक्ष बागा आहेत. नुकतीच कुठे द्राक्ष काढणीला सुरवात झाली होती. तत्पूर्वी खबरदारी म्हणून जवळपास सर्वच शेतकऱ्यांनी द्राक्षाचा घडांना पेपर लावून सुरक्षित केले होते.
मात्र पावसामुळे हे सर्व पेपर गळून पडले. त्यामुळे या पेपरचे डाग द्राक्षाच्या घडांवर पडल्याने हे घड मातीमुळे होतील. तसेच देठातून पाणी आत शिरले तर हे घड सडण्याचीदेखील शक्यता असल्याने जवळपास 25 ते 50 टक्के नुकसान सोसावे लागण्याची चिन्ह दिसू लागल्याने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास गेल्यात जमा आहे.
हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....
ऐन होळीच्या सणालाच आपत्ती आल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत. परिसरातील प्रत्येक शेतकऱ्याचे गव्हाचे पीक होते. मात्र सोंगणीला आलेला हा गहू अक्षरश आडवा पडल्याचे चित्र संपूर्ण परिसरात दिसत होते.
या दोन मुख्य पिकांसोबत मोठ्या प्रमाणात कांदा, टॅमोटो, बटाटा, पालेभाज्यांचेदेखील नुकसान झाले आहे. शासनाने आता याबाबत शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असा काहीतरी निर्णय घेण्याची मागणी परिसरातील शेतकरी त्र्यंबक कोंबडे, सोमनाथ बोराडे, बाळू कोंबडे, चंद्रभान कोंबडे, खंडू धोंगडे, भाऊसाहेब जाचक, उत्तम जाधव, सदाशिव जाधव, बाकेराव डेमसे, तानाजी गवळी, विष्णू डेमसे, संजय जाचक, सुदाम जाचक आदींनी केली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.