Nashik News : रस्ते खोदाई विरोधात उपोषण

hunger strike against road digging
hunger strike against road diggingesakal
Updated on

नाशिक : प्रभाग १२ मधील स्थानिक नागरिकांना कुठलीच पूर्वसूचना न देता स्मार्टसिटी कंपनीकडून टिळकवाडीतील रस्त्यांची खोदाई सुरू केल्याने या भागातील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. याशिवाय जलवाहिनी फुटल्याने नागरिकांना कमी प्रमाणात पाणीपुरवठा तसेच दूषित पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे या भागातील माजी नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी उपोषण सुरू केले. (hunger strike against road digging without giving prior notice by smart city company nashik)

टिळकवाडी येथे मागील पंचवार्षिकमध्ये विविध ठिकाणी नगरसेवक निधीतून पाणीपुरवठा व ड्रेनेजलाइन कामे झाली. त्यानंतर कॉलनीअंतर्गत रस्त्यांचे पूर्णतः डांबरीकरण करून साइड पट्ट्यामध्ये पेव्हर ब्लॉक टाकले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर आठ दिवसांमध्ये स्मार्टसिटीअंतर्गत कोणतीही पूर्वसूचना न देता टिळकवाडी येथील रस्ते मधोमध फोडले गेले.

यामध्ये टेलिफोन लाईन, एमएसईबी लाईन व पाण्याच्या लाइनचे नुकसान झाले. वांरवार आंदोलन केल्यानंतर रस्ते दुरुस्त करण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र प्रत्यक्षात आश्वासन दिल्याप्रमाणे कामे झाली नाही. रस्त्यांना ठिगळ लावले गेले. पिण्याच्या पाण्याच्या लाईनमध्ये ड्रेनेजचे पाणी मिश्रित दोन महिन्यापासून दुर्गंधीयुक्त पाणी प्यावयास लागत आहे.

हेही वाचा : भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ

hunger strike against road digging
Nashik News : अनधिकृत सावकारांच्या घरांवर धाडसत्र; उपनिबंधक कार्यालयाची कारवाई

शोध घेऊनही लिकेज सापडत नाही. पाण्याची लाईन बायपास करण्याची वारंवार आश्वासने देऊन अजूनही ते काम पूर्णत्वास गेलेले नाही. खोदलेले खड्डे अद्यापपर्यंत भरले गेले नाही. खड्ड्यांमुळे सहा ते सात वेळा अपघात झाले. गेल्या चार दिवसांपूर्वी कुसुमाग्रज प्रतिष्ठान टिळकवाडीला लागून पाच फुटापेक्षा जास्त जेसीबी लावून अर्ध्या तासांमध्ये रस्ता खोदला गेला. याबाबतची पूर्वसूचना देण्यात आली नाही.

सदर रोड स्मार्टसिटीने खोदला की महापालिकेने यासंदर्भात समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अनेकदा रस्ता फोडले जात असल्या आरोप डॉ. पाटील यांनी करत टिळकवाडी येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. दरम्यान, स्मार्टसिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांनी आठ दिवसात काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर पाटील यांनी उपोषण मागे घेतले.

hunger strike against road digging
नारोशंकराची घंटा : स्पर्धेत अधिकाऱ्यांची दादागिरी...!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.