Nashik News: जनावरांच्या चाऱ्यासाठी शोधाशोध; दुष्काळग्रस्त परिस्थितीने पशुधनपालक हवालदिल

Fodder
Fodderesakal
Updated on

Nashik News : चालू वर्षी सिन्नर तालुक्यात पावसाळ्यापासूनच दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने खरीप हंगामातील मका, बाजरी, सोयाबीन आदी पिके जळून खाक झाली किंवा शेतात करपून गेलेली आहेत.

त्यामुळे आगामी काळात जनावरांसाठी लागणारा चारा उपलब्ध व्हावा, यासाठी पशुधन सांभाळणाऱ्या शेतकऱ्यांकडून चाऱ्यासाठी सर्वत्र शोधाशोध केली जात आहे. आगामी काळात टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी काहीही भावाने मिळेल तेथून चारा जमा करण्याचे शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. (hunt for fodder from farmers tending to livestock nashik news)

संपूर्ण पावसाळा गेला तरी समाधानकारक पाऊस झाला नाही. खरीप हंगामात बहुतांश शेतकरी मका, बाजरी, सोयाबीन आदी पिकांची पेरणी प्रामुख्याने करतात, कारण या पिकांपासून उत्पादन कमी मिळाले तरी चालेल, परंतु जनावरांसाठी वर्षभर लागणारा चारा उपलब्ध व्हावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना असते.

मात्र यावर्षी शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. चालूवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीस पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांनी महागडी बियाणे खरेदी करून मका, बाजरी, सोयाबीन, मठ, मूग आदी पिकांची पेरणी केली. मात्र पेरणीनंतरचे पावसाळ्यातले सर्व नक्षत्र कोरडे गेल्याने व सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण कमी असल्याने नद्या नाले, विहिरींनाही पाणी आले नाही.

परिणामी, या पिकांना पाणी देता न आल्याने शेतातील पिके जळून खाक झाली आहेत. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांपासून मिळणारे उत्पन्न तर दूरच परंतु केलेला खर्चही निघाला नाही. नद्यांना काही ठिकाणी पाणी आले असता कालांतराने ते आटून गेल्याने नदी नाले कोरडे ठाक पडले आहे.

Fodder
Jalgaon Agriculture News : यंदा खरीप पिकांच्या उत्पादनात घट; रावेर तालुक्यात कमी पाऊस

जनावरांचा चाराही उपलब्ध होऊ न शकल्याने जनावरे कशी सांभाळायची याबाबत चिंता आहे. नातेवाइकांसह इतर ठिकाणाहून चारा मिळविण्यासाठी शोधाशोध सुरू असून, 'चारा मिळेल का, चारा' असे म्हणण्याची वेळ पशुपालकांवर आली असून, मिळेल त्या किंमतीत चारा जमा करण्याची धावपळ सुरू आहे.

"चालूवर्षी पाऊस झालाच नाही असे म्हणावे लागेल. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांपासून मिळणारे उत्पन्न तर दूरच, पण जनावरांना किमान चार महिने पुरेल इतकाही चार शेतातून मिळालेला नाही. जनावरांसाठी दुसऱ्या गावाहून महागडा चारा विकत घेण्याची वेळ आली आहे.आमच्या कुटुंबाच्या सदस्याप्रमाणेच आमचे पशुधन हे जिव्हाळ्याचे घटक असून त्यासाठी मिळेल त्या भावाने आम्ही चारा विकत घेतो त्यामुळे पशुधन संकटात आले आहे." - अमोल गोळेसर, पशुपालक शेतकरी

"सिन्नर तालुक्यातील पूर्व भाग हा अतिशय दुष्काळग्रस्त असल्याने पशुधन हे आमचे महत्त्वाचे साधन असून यावर्षी पावसाने अनेक ठिकाणी दडी मारल्याने सर्व ठिकाणी दुष्काळग्रस्त स्थिती निर्माण झाली आहे. प्रत्येकाकडे पशुधन असल्याने चाऱ्याची टंचाई भासत असल्याने चारा मिळेल का चारा अशी वेळ आता म्हणण्याची वेळ आली आहे. सिन्नर तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर झाला असून लवकरात लवकर शासनाने चारा व इतर योजनांची अंमलबजावणी करावी." - मधुकर गडाख, शेतकरी

Fodder
Nashik Agriculture News: गळीत हंगामाची यंदा अग्नीपरीक्षा; पावसाअभावी उत्पादनात घट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.