Nashik News : विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आता आदर्श शाळा

School News
School Newsesakal
Updated on

इगतपुरी : जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्याच्या उद्देशाने राज्यात २०२६ पर्यंत आदर्श शाळा योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेद्वारे आता जिल्हा परिषद शाळेतील वर्गांचेही रूप बदलत आहे.

या उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील ४८८ शाळा आदर्श होणार आहे. त्यासाठी पहिली व दुसरीच्या वर्गांवर विशेष भर दिला जाणार आहे. या उपक्रमात एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तकांचा सुनियोजित वापर केला जाणार आहे. (Ideal school now for quality education for students Nashik News)

School News
Nashik News : लाल कांद्याचे भाव स्थिरावणार...

सध्या जिल्हा परिषद शाळांची स्पर्धा खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांसोबत सुरू आहे. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण रोखण्यासोबतच गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, विद्यार्थ्यांमध्ये नावीन्यपूर्ण कौशल्ये विकसित व्हावी, यासाठी आदर्श शाळा योजना साहाय्यक ठरणार आहे.

आदर्श शाळा योजनेत महाराष्ट्रातील ४८८ शाळांना आदर्श करण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी सध्या शिक्षकांचे सक्षमीकरण करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय गुणवत्ता, पालकांचा विश्वास, पटसंख्या वाढ यासाठी आदर्शशाळा योजनेत विशेष लक्ष दिले जाणार आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सर्वांगीण भौतिक व शैक्षणिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देत शाळांसह विद्यार्थ्यांचीही गुणवत्ता वाढणार आहे.

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

School News
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी’ मुळे 50 कोटींच्या इंधनाची बचत

राज्यात ६७ हजाराचे उद्दिष्ट

आदर्श शाळा ही योजना २०२५ ते २६ पर्यंत राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील ४८८ शाळा आदर्श केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ६७ हजार शाळा आदर्श करण्याचे काम हाती घेतले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गुणवत्ता वाढविण्याकरिता आदर्श शाळा हा उपक्रम विशेष ठरत आहे. सध्या राज्यातील ४८८ शाळांमध्ये या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे. शाळांची पटसंख्या, विद्यार्थ्यांची गुणवत्ता अशा विविध निकषांच्या आधारे शाळांची निवड करण्यात आली आहे. आदर्श शाळांसाठी इयत्ता पहिली व दुसरीच्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षणाच्या आधारावर सध्या शाळांमध्ये उपाययोजना करण्यात येत आहेत. आता या योजनेंतर्गत गुणवत्तापूर्ण विकास आराखड्यावर काम सुरू आहे.

School News
Nashik News : Helmetसक्तीची कारवाई पुन्हा जोमात; 300 दुचाकीस्वारांना ठोठावला दंड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.