वणी (जि. नाशिक) : आजच्या काळात लग्नसमारंभ थाटामाटात करण्याची जणू पद्धतच रूढ झाली आहे. लग्नसमारंभावर लाखो रुपये खर्च केले जातात.
पण वणी येथे काजीम सैय्यद यांच्या मुलीस बघायला आलेले हसनापूर (ता.राहाता) येथील शौकतअली सैय्यद व कुटुंबातील सदस्यांनी बडेजावपणा व अनावश्यक खर्चाला फाटा देत ‘चट मंगनी पट ब्याह' करून मुस्लिम समाजासमोर एक आदर्श निर्माण केले आहे. (Ideal wedding in Muslim society Nikah ended in program to watch bride groom at vani nashik news)
हसनापूर येथील शौकतअली सैय्यद हे मुलगा सैफअली साठी वणी येथील मजुरीचे काम करणारे काजीम सैय्यद यांची मुलगी रोजमीन हीस बघण्यासाठी आले होते. मुस्लिम धार्मिक शिक्षण घेतलेले वधू रोजमीन सैय्यद व वर सैफअली सैय्यद या दोघांनीही एकमेकांना पसंत केले.
दोन्ही परिवाराचीही पसंती होवून लवकरच निकाहची तारीख ठरवून निकाहबाबतची चर्चा दोन्ही परिवारात सुरु असताना मुलीचे आजोबा हाजी अब्दुलगणी सरदार सैय्यद (रा. कोकणगाव) यांनी पुढे कधीतरी निकाहची तारीख निश्चित करुन वेळ व खर्च वाया घालविण्यापेक्षा लागलीच लग्न लावून देण्यास काय हरकत आहे? असा प्रस्ताव समोर मांडला.
या प्रस्तावावर विचार करत दोन्ही परिवारांनी त्याला लागलीच होकार दिला आणि अवघ्या दोन- तीन तासांतच कौटुंबिक वातावरणात मोजक्या समाजबांधव, आप्तेष्टांच्या उपस्थितीत इस्लाम धर्म पद्धतीने रोजमीन आणि शौकतअली यांचा निकाह इमान हाफीज जावेद यांनी लावला.
हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...
सामाजिक कार्यकर्ते जमिर शेख, बंटी सैय्यद, मुन्ना सैय्यद, रिजवान सैय्यद आदींसह मुस्लिम पंच कमिटी सदस्य, दोन्ही परीवारातील पंचवीस ते तीस सदस्य उपस्थित होते. दुल्हा दुल्हनला (वधू- वरास) आशीर्वाद दिले.
मुस्लिम समाजातील दोन्ही परिवारांनी वेळ, श्रम व पैशांची बचत करून समस्त मुस्लिम समाजात एक नवीन आदर्श निर्माण केला असल्याचे जावेद हाफिज यानी सांगितले. समाजाला आता अशा प्रकारच्या विवाहांची गरज असून दोन्ही परिवाराचे अभिनंदन व कौतुक होत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.