खामखेडा (जि. नाशिक) : गेल्या २० वर्षांत कमी पाण्यात, ६० दिवसांच्या खरीप हंगामातील कोबीच्या उत्पादनातून खामखेड्याचे अर्थकारण बदले असून, कोबीचे आगर म्हणून ओळख मिळाली आहे.
काही शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत २० ते २२ वर्षांपूर्वी कोबीचे उत्पादन घेण्यास सुरवात केली. कमी पाण्यात व केवळ दोन महिन्यांत चांगले उत्पादन मिळाल्यामुळे गावकऱ्यांना या प्रयोगातून प्रगतीतीची वाट दिसली. (Identification of Khamkheda as cabbage capital Income more than 10 lakhs nashik Latest Marathi News)
गावातील ५० टक्क्यांहून अधिक शेतकरी २० गुंठ्यापासून चार ते दहा एकरापर्यंत खरीप हंगामात कोबीची लागवड करतात. एकरी २० ते २५ टन कोबीचे उत्पादन मिळते. मागील वर्षी कमी भाव मिळाला होता. त्यामुळे या वर्षी लागवड कमी झाली. मात्र, यंदा सरासरी ३० रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाल्याने सर्वच कोबी उत्पादकांना चांगला पैसा मिळाला. गावातील पन्नासहून अधिक शेतकऱ्यांना दहा लाखांहून अधिक कोबीचे उत्पन्न मिळाले आहे.
व्यापाऱ्यांचा तळ
येथील कोबीस अमदाबाद, राजकोट, सुरत, बडोदा, नडियाद, जामनगर, नोएडा, दिल्ली, जयपूर, उदयपूर या भागात मोठी मागणी असते. दरवर्षी अमदाबाद, राजस्थान, राजकोट, दिल्ली येथील व्यापारी, आडते खामखेड्यात दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ तळ ठोकून असतात.
स्थानिक तरुणही व्यापारात
गावातील दहापेक्षा अधिक तरुण परप्रांतीय व्यापाऱ्यांना कोबी खरेदीस मदत करतात, तर अनेक तरुण स्वत: खरेदी केलेला मालाला बाजारपेठेत सोडतात. यामुळे गावातील तरुणांनाही व्यापारात संधी मिळाली आहे.
तरुणांना रोजगार
कोबी काढण्यासाठी मजुरांना मोठी मागणी असते. एका व्यापाऱ्याकडे गावातील २५ ते ३० तरुणांची टोळी असते. सर्व व्यापाऱ्यांकडे मिळून दोनशे ते अडीचशे तरुणांना कोबी काढणी, गोणी भराई, ट्रक लोडिंग, अशी कामे मिळू लागले आहेत. शेजारील चाचेर, जायखेडा, गंगवान आदी गावांतील मजूरही या कामासाठी असतात.
खतांना मागणी
गावात दीड ते दोन हजार एकर क्षेत्रावर कोबीची लागवड झाली आहे आणि फवारणीशिवाय कोबी येऊ शकत नसल्याने आठवड्यात पिकाला फवारणी घ्यावीच लागते. सावकी, विठेवाडी, भऊर, बगडू ,पिळकोस, विसापूर,भादवण या गावांतील शेतकरी या पिकास पसंती देऊ लागले आहेत. त्यामुळे गाव व परिसरात कीटकनाशक, औषधे व खतांच्या विक्री करणाऱ्या दुकानामध्ये वाढ झाली असून, एका गावात पाचपेक्षा अधिक विक्रेते झाले आहेत. खतांच्या विक्रीत वाढ झाली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.