Nashik Drought News : कुठल्याही धरणातून पाणी आरक्षित नसलेल्या दुष्काळग्रस्त गावांना पाणीपुरवठा कसा होईल, याचे सूक्ष्म नियोजन न करता मागील वर्षीचे आकडे सादर करत जलसंपदा विभागाने धूळफेक केली आहे. दुष्काळग्रस्त गावांना पाणी मिळाले नाही तर जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना सोडणार नाही, असा इशारा देत आमदार डॉ. राहुल आहेर यांनी ओझरखेड व चणकापूर धरणांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना आढावा बैठक घेण्यास भाग पाडले.
जिल्ह्यात यंदा अभूतपूर्व दुष्काळ आहे. टँकरने पाणीपुरवठा सुरू असल्याने पिके व फळबागा टिकविण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे. (If drought affected villages do not get water will not leave officials of water resources department warned by Dr Rahul Aher nashik news)
अशा परिस्थितीत पाटाला पाणी सोडण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने कसे केले आहे, याविषयी आमदारांनी पाणी आरक्षण बैठकीत सोमवारी (ता. ६) विचारणा केली. चांदवड तालुक्यातील वाहेगाव, वाकी या गावांना पाणी कसे देणार, याविषयी आमदार डॉ. आहेरांनी प्रश्न उपस्थित केला.
त्यावर उत्तर देताना अधिकारी म्हणाले, की ओझरखेड डावा कालव्यातील पाटचारी शून्य ते ४९ पर्यंतचे काम झाले आहे. पण त्यापुढील काम अपूर्ण असल्यामुळे पाणी पुढे जाणे अशक्य आहे. हा विभाग नांदूरमध्यमेश्वर प्रकल्पांतर्गत येतो. या विभागाचे अधिकारीच बैठकीला उपस्थित नव्हते. त्यामुळे हा प्रश्न अपूर्ण राहिला.
जिल्ह्यातील किती पाटांचे काम अपूर्ण आहे, याचा आढावा घेऊन पाटबंधारे विभागाने आढावा सादर करण्याची मागणी आमदार ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केली. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार दिलीप बनकर, आमदार नितीन पवारांनीही पाण्याच्या नियोजनाबाबत पुन्हा आढावा घेण्याची मागणी केली.
जिल्हाधिकाऱ्यांची गुरुवारी बैठक
ओझरखेड व चणकापूर या धरणांतून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे नियोजन व पाण्याच्या आकस्मिक आरक्षण निश्चितीसाठी गुरुवारी (ता. ९) जिल्हाधिकारी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेणार आहेत.
धरणसाठ्याची आकडेवारी चुकीची
इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यांतील धरणे शंभर टक्के भरल्याचे दाखवले जाते. प्रत्यक्षात धरणांत एवढा साठा नाही. पण जलसंपदा विभागाचे अधिकारी चुकीचे आकडे दाखवतात, असा आरोप आमदार हिरामण खोसकर यांनी केला. त्यामुळे धरणसाठ्याचा फेरआढावा घेऊन वास्तवदर्शी आकडेवारी येत्या दोन आठवड्यांच्या आत सादर करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.