Nagli Papad : इगतपुरीच्या अर्थकारणाला नागलीची साथ! महाराष्ट्रासह गुजरातमध्ये पापडाला ग्राहकांची मागणी

Ongoing preparation of papda by housewives in Shirsat family in Igatpuri Chhatrapati Shivaji Chowk.
Ongoing preparation of papda by housewives in Shirsat family in Igatpuri Chhatrapati Shivaji Chowk.esakal
Updated on

Nagli Papad : आदिवासी बहोल अन पर्जन्यवृष्टीचे माहेरघर असलेले इगतपुरीचा भाग हिरव्याकंच निसर्गराजीनं नटलेला आहे. तसेच इगतपुरीच्या अर्थकारणाला नागलीच्या गृह उद्योगाचे कोंदण लाभले आहे.

राधाबाई गोविंद शिरसाट (वय ६५) यांनी चाळीस वर्षांपूर्वी रोजगारातून संसार फुलवण्याचे स्वप्न पाहिले.

ते साकारण्यासाठी माहेरच्या सुगरणीच्या कलेला व्यावसायिक रुपडं दिले. कुटुंबात नागलीच्या पापडाला उडीद, साबुदाणा, बटाटा, तांदळाच्या पापडासह शेवया उत्पादनाची जोड दिली आहे. (Igatpuri economy boost by Nagli home industry papad consumer demand in Gujarat including Maharashtra nashik news)

इगतपुरी शहर परिसरातील भागात घरपोच पापड विक्री करणाऱ्या राधाबाईंच्या पापड तयार करण्याच्या व्यवसायाने उंच भरारी घेतली. त्यांनी तयार केलेल्या रुचकर-चविष्ट पापडाप्रमाणे शेवया, डाळींचे वड्याला महाराष्ट्रासह गुजरातमधील ग्राहकांची मागणी आहे.

गृह उद्योगाला प्राधान्य देताना नेमका कोणता व्यवसाय करावा? जेणेकरून प्रपंच सुरळीत चालेल. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारणा होण्यास मदत होईल, असा विचार इगतपुरी येथील छत्रपती शिवाजी चौकातील राधाबाई व त्यांची मुलगी, सुनेने घरगुती व्यवसायाचा विचार कृतीत उतरवला.

त्यांनी पापड व्यवसाय निवडला. इगतपुरीत येणाऱ्या पर्यटकांकडून या पापडाला ‘इंडियन स्टार्टर’ ची जागा मिळाली.

राधाबाईने तयार केलेल्या नागलीसह अनेक पदार्थ व उपवासाच्या पापडाला मागणी वाढत आहे. सुरवातीला दिवसाला शंभर पापड विक्री होऊ लागली. हळूहळू पापडाला मागणी वाढल्याने त्यांनी पापडाचे यंत्र विकत घेतले आणि उत्पादन वाढवले.

आता दिवसाला ४० ते ४५ किलो पापड विक्री होत असल्याचे राधाबाई सांगतात. नागली विकत आणून यंत्रात दळली जाते. त्यानंतर लेक व सूनेसोबत राधाबाई पापड तयार करतात. एका किलोत १०० हून अधिक पापड तयार होतात. पापड विक्रेते राधाबाईंकडून पापड विकत घेऊन महाराष्ट्रसह गुजरातमध्ये विकतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Ongoing preparation of papda by housewives in Shirsat family in Igatpuri Chhatrapati Shivaji Chowk.
SAKAL Impact: खेडलेझुंगे गोदापात्रातील हिरव्या रंगाच्या पाण्याचे प्रदूषण नियंत्रण विभागाने घेतले नमुने

पापडांचा भाव (आकडे रुपयांमध्ये)

० मोठे १०० नागली पापड-३००

० एक किलो छोटे नागली पापड-२००

० मोठे १०० तांदळाचे पापड-३००

० मोठे १०० बटाटा पापड-३००

० मोठे एक किलो उडीद पापड-३५०

(एक किलो कुरडई-४०० रुपये आणि १ किलो शेवया-१ हजार १ रुपये)

"लग्न करून सासरी आल्यावर जेवणात रुचकरपणा आणि कमी खर्चात स्वादिष्टपणा आणत घरातील सर्वांची मने जिंकायचे. घरचे कौतुक करायचे. आपल्या कलेचा ठसा उमटवताना कुटुंब प्रसन्न आहे आणि आनंद जोपासला जात असल्याचे पाहून छान वाटत होते. पतीला घरगुती व्यवसाय करण्याचा सल्ला विचारला. त्यांच्या होकाराने ऊर्जा मिळाली आणि पापड व्यवसाय सुरु केला." - राधाबाई गोविंद शिरसाट

Ongoing preparation of papda by housewives in Shirsat family in Igatpuri Chhatrapati Shivaji Chowk.
Nashik News : शिवसेना वैद्यकीय कक्षाचा गरजूंना आधार! 4 वर्षांत वैद्यकीय बिलांत मिळाली 75 लाखांची सवलत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.