नाशिक : इगतपुरी येथील बहुचर्चित रेव्ह पार्टींतील अभिनेत्री हिना पांचाळसह सर्व संशयितांना जिल्हा व सत्र न्यायाधिश एस. पी. नाईक- निंबाळकर यांच्या न्यायालयात बुधवारी (ता.७) हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या सर्वांची न्यायालयाने नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली. (Igatpuri Rev Party caseheena panchal and other suspects sent to Nashik Road Jail)
इगतपुरी येथील स्काय ताज व्हिला आणि स्काय लगून व्हिला या दोन खासगी बंगल्यांमध्ये शनिवारी (ता.२६ जून) ग्रामिण पोलिसांनी छापा टाकून अमली पदार्थांच्या नशेत तर्रर्र असलेल्या महिला व पुरूषांना जेरबंद केले होते. या प्रकरणी इगतपुरी पोलिस ठाण्यात विभत्स वर्तन, विनापरवाना अंमली पदार्थ बाळगणे व त्याचे सामुहिकपणे सेवन करणे आणि कोरोनाच्या नियमावलीचे उल्लंघन आदींसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इगतपुरी येथील न्यायालयाने हिना पांचाळ या अभिनेत्रीसह उर्वरीत संशयितांच्या पोलिस कोठडीत वाढ केली होती. त्या पाठोपाठ संशयितांना मंगळवारी (ता.६) अंमली पदार्थ विरोधी कायदा (एनडीपीएस) गुन्ह्यात येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने पुन्हा एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती.
संशयितांची बुधवारी पोलिस कोठडी संपल्याने सगळ्यांना नाशिक येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. सुमारे तास भर दोन्ही पक्षांतर्फे जोरदार युक्तीवाद होउन न्यायालयाने संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे संशयीतांची नाशिक रोड येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. दरम्यान संशियतांसाठी आज न्यायालयाच्या आवारात मुंबईसह चित्रपटसृष्टीतील अनेक मंडळी ताटकळत होती. न्यायालयीन कोठडीचा आदेश झाल्यानंतर तातडीने जामीनासाठी हालचाली गतीमान करण्यात आल्या. दरम्यान आता कोरोनामुळे संशयितांना थेट न्यायालयात नेण्याऐवजी तात्पुरत्या कारागृहाची सोय केलेल्या शाळेत ठेवले जाणार आहे.
(Igatpuri Rev Party case Hina Panchal and other suspects sent to Nashik Road Jail)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.