Nashik Igatpuri Tourism: निसर्गसौंदर्याने बहरला इगतपुरी तालुका! हिरवागार शालूने खुलला कसारा घाट

A green railway tunnel. The waterfalls flowing in the Bhavli dam area have charmed the travelers and the amateur tourists in the rainy season.
A green railway tunnel. The waterfalls flowing in the Bhavli dam area have charmed the travelers and the amateur tourists in the rainy season.esakal
Updated on

Nashik Igatpuri Tourism : सह्याद्रीच्या पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेल्या इगतपुरी तालुक्यात अखंडपणे कोसळणाऱ्या पावसाच्या सरी, त्यासोबत असणारे दाट धुके व वेगाने वाहणारे वारे, पावसामुळे संपूर्ण तालुक्यात पसरलेला हिरवागार गालिचा, हिरवाईने नटलेले डोंगर, पावसाळी ढगांच्या दुलईत शिरलेली शिखरे व कडेकपारीतून वाहत येणाऱ्या निर्झराचे उंचावरून पडणारे धबधबे, असे मनमोहक चित्र सध्या इगतपुरीसह कसारा घाट व परिसरात दिसत आहे.

निसर्गाने बहरलेले रेल्वेचे बोगदे, वळणावळणांचा कसारा घाट व भारतीय मध्य रेल्वेचा ब्रिटिशकालीन हिवाळी ब्रिज पर्यटकांचे मुख्य आकर्षक ठरत आहे. (igatpuri taluka bloomed with natural beauty Kasara Ghat nashik news)

भारतीय मध्य रेल्वेच्या भुसावळ-मुंबई लोहमार्गावरील कसारा घाटात असलेल्या मध्य रेल्वेच्या हिवाळी ब्रिजवरून मार्गक्रमण करताना रेल्वे एक्स्प्रेस.
भारतीय मध्य रेल्वेच्या भुसावळ-मुंबई लोहमार्गावरील कसारा घाटात असलेल्या मध्य रेल्वेच्या हिवाळी ब्रिजवरून मार्गक्रमण करताना रेल्वे एक्स्प्रेस.esakal

कसारा ते इगतपुरीदरम्यान सुमारे १७ किलोमीटर अंतराच्या या घाटात रेल्वेचे अनेक बोगदे असून, जाताना-येताना पावसाळ्यात धबधबे, खोल दरी, डोंगरदऱ्या व हिरवाईने नटलेले डोंगर जणू स्वर्गच असल्याचा भास प्रवाशाला वाटतो.

तसेच मुख्य आकर्षण म्हणजे हिवाळी ब्रिज (रेल्वे पूल) आहे. या पुलावरून रेल्वे जाताना आपण आकाशात तर तरंगत नाही ना, असा भास होतो.

इगतपुरी ते कसारा रेल्वेचे तीन रेल्वेलाइन आहेत. प्रत्येक बोगदा पार करताना मोठ-मोठे धबधबे पाहावयास मिळतात.

हाच अनुभव मुंबई-नाशिकच्या महामार्गावरील कसारा घाटातही पाहाण्यास मिळतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मुंबईचे हौशी पर्यटक भावली धरण परिसरातील धबधब्याचा आनंद या काळात हमखास घेत असतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

A green railway tunnel. The waterfalls flowing in the Bhavli dam area have charmed the travelers and the amateur tourists in the rainy season.
Nashik Phalke film industry : मुंढेगाव येथे दादासाहेब फाळके चित्रपटसृष्टी जागेसाठी दादा भुसेंचे साकडे

वन विभागाचे दुर्लक्ष कायम

पावसाळा असला, की मुंबई-आग्रा महामार्गावर व रेल्वे घाटातील सर्व कर्मचारी अलर्ट असतात. मात्र ज्यांच्या हद्दीतून दरडी कोसळतात किंवा अशा घटना घडतात त्या विभागाचे कर्मचारी व त्यांचे अधिकारी कधीच दिसत नाही.

ते कर्मचारी आपत्कालीन वेळी मदत न करता बघ्याची भूमिका वन विभागाचे कर्मचारी घेत असतात. कसारा घाटालगत वनक्षेत्रपाल कसारा यांची मालमत्ता आहे व त्यांच्याच मालमत्तेतून राष्ट्रीय महामार्गावर दगड, माती, तसेच रेल्वेरुळावरही बहुतेक वेळा दगड, माती पावसाळ्यात पडत असते.

परंतु वन विभागाचे कर्मचारी, अधिकारी आजपावेतो कधीच घटनास्थळी आलेले नाही. असेही काही त्रस्त वाहनचालक आवर्जून सांगतात.

A green railway tunnel. The waterfalls flowing in the Bhavli dam area have charmed the travelers and the amateur tourists in the rainy season.
Nashik Rain Update : घाटमाथ्यासह त्र्यंबकेश्‍वरच्या सर्वदूर पावसाची प्रतीक्षा कायम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.