IIM Selection : १९६१ साली आयआयएम (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट) अहमदाबाद स्थापनेप्रसंगी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सांगितले होते, ही विद्यापीठे आधुनिक भारतातील येणाऱ्या कित्येक पिढ्यांसाठी मंदिराइतकीच पवित्र असतील’.
आज साठ वर्षांनंतरही या विद्यापीठांचे पावित्र्य आणि दर्जा हयात कुठलीही तडजोड झालेली नाही. आज फक्त भारतातल्याच नाही तर जगातल्या सर्व मोठ्या संस्थांचे शीर्ष नेतृत्व ‘आयआयम’मधून पदवी घेणारे करत आहेत. (IIM Selection increased from nashik news)
दरवर्षी दोन लाखांहून अधिक विद्यार्थी संपूर्ण भारतातून कॅट या परीक्षेची तयारी करून व्यवस्थापनक्षेत्रातील एक महत्त्वाची पदवी एमबीएसाठी भारतातल्या २० सर्वोत्तम आयआयम येथे प्रवेश करण्यासाठी जिवाचे रान करतात.
अशा राष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठात नाशिकची मुलेही चमकत आहे. २००२ पासून नाशिक आणि नाशिक रोड येथे कार्यरत असलेल्या टाइम इन्स्टिट्यूटने आतापर्यंत हजारोंच्या संख्येने शहरातील विद्यार्थ्यांना कॅट परीक्षेत अव्वल स्थान मिळवून दिले आहे.
या वर्षी ३२० हुन अधिक आयआयएम कॉल्स टाइम इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांना मिळाले आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचा शहरातील इतर विद्यार्थ्यांबरोबर संवाद ‘कॅट रणनीती’ कार्यक्रम रविवारी (ता.१४) सीएमसीएस कॉलेज येथे झाला.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
याप्रसंगी आयआयएम अहमदाबाद, बंगलोर, कोलकत्ता या तीन सर्वाच्च विद्यालयात निवड झालेले सौरभ वाणी, मिहीर गायधनी, क्रिश बोरसे, सलोनी महाजन, दिशा क्षत्रिय, यशराज ठाकरे, हर्ष मिश्रा या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे सूत्र समजावून सांगितले तसेच या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी मोठ्या शहरात जाण्याची गरज नाही हेही अधोरेखित केले.
टाइम इन्स्टिट्यूटचे संचालक विशाल जातेगावकर यांनी प्रास्ताविक केले. यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार संचालक जितेंद्र पमनानी, क्षमा अर्चना फर्नांडिस, सागर सोनावणे, प्रणिता बोरा, कुमार शिंदे यांच्या हस्ते झाला.
विद्यार्थ्यांची प्रकट मुलाखत ज्योती वर्मा, वैभव खंडेलवाल या ज्येष्ठ शिक्षकांनी घेतली. कार्यक्रम यशस्वितेसाठी सायली गोसावी, नीलेश वाघ, देवदत्त जोशी यांनी परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.