IIT Powai Report: कालबाह्य तंत्रज्ञानामुळे नदीपात्रावर फेसाळ पाणी; एकच सल्लागार संस्था नियुक्त करण्याचा सल्ला

NMC News
NMC News esakal
Updated on

IIT Powai Report : गोदावरीसह उपनद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी महापालिकेने केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाला सादर केलेल्या ५३० कोटींच्या प्रस्तावाला राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालय (एनआरसीडी) ने हिरवा कंदील दाखविला आहे.

असे असले तरी चार मलनिस्सारण केंद्राच्या क्षमतावाढीसाठी सध्या अस्तित्वात अपफ्लो अॅनारोबिक स्लज ब्लँकेट (युएएसबी) रिॲक्टर तंत्रज्ञान कालबाह्य झाल्याचा अहवाल पवई आयआयटीने महापालिकेला दिला आहे.

त्याचबरोबर मलनिस्सारण केंद्रासह नमामि गोदा प्रकल्पांसाठी स्वतंत्र सल्लागार संस्था नियुक्त करण्याऐवजी एकच सल्लागार नियुक्त केल्यास भिन्न अहवाल तयार होणार नसल्याच्या कानपिचक्या दिल्या. (IIT Powai Report Outdated technology causes foamy water in riverbed Advice on appointing single consultancy firm nashik nmc)

मलजल व्यवस्थापनाकरीता महापालिकेने आठ सिव्हरेज झोन तयार केले आहेत. सांडपाणी वाहून नेण्यासाठी १९१९ किलोमीटर लांबीच्या मलवाहिका टाकल्या आहेत.

सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी तपोवन, आगर टाकळी, चेहेडी, पंचक, गंगापूर व पिंपळगाव खांब अशा आठ मलनिस्सारण केंद्रांची उभारणी केली आहे. १८ पंपिंग स्टेशनद्वारे मलवाहिकांच्या माध्यमातून या आठ मलनिस्सारण केंद्रांमध्ये सांडपाणी आणले जाते.

त्यावर मलनिस्सारण केंद्रांमध्ये प्रक्रिया करून प्रक्रियायुक्त सांडपाणी नदीपात्रात सोडतात. तपोवन, आगर टाकळी, चेहेडी व पंचक येथील मलनिस्सारण केंद्रे २०१५ पूर्वीपासून कार्यान्वित आहेत.

ज्या वेळी या मलनिस्सारण केंद्रांची उभारणी करण्यात आली. त्या वेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार त्यांची संरचना होती.

परंतु नदीत सोडल्या जाणाऱ्या मलजलाच्या निकषांमध्ये सुधारणा करण्यात आली असून, नवीन मापदंडानुसार मलशुध्दीकरण केंद्र अद्ययावत करण्यासाठी तपोवन, आगर टाकळी, चेहेडी व पंचक या ४ मलशुध्दीकरण केंद्रांचा अहवाल महापालिकेने शासनाच्या पर्यावरण विभागाकडे ऑक्टोबर २०२१ मध्ये सादर केला.

राज्य नदी संवर्धन योजनेंतर्गत सचिव स्तरावरील समितीने जून २०२२ मध्ये मान्यता देऊन सदर कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल केंद्र सरकारला जुलै २०२२ मध्ये सादर केला. राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालयाने प्राथमिक छाननीनंतर सुधारित अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.

त्यानुसार महापालिकेने ५३०.३१ कोटी रुपयांचा सुधारित प्रकल्प अहवाल केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाला सादर केला. या मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालयाने प्रस्तावाला मान्यता देत छाननीसाठी आयआयटीकडे सादर केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

NMC News
NMC News : तांत्रिक सर्वेक्षणासाठी IIT पवईची मदत; मुंबई नाका परिसरात अंडरपास

म्हणून फेसाळयुक्त पाणी

तपोवनात १३० दशलक्ष लिटर्स क्षमतेचे मलनिस्सारण केंद्र आहे. तर चेहेडी येथे ४२ दशलक्ष लिटर्स, टाकळी येथे एक ७२ तर दुसरा प्रकल्प ४० दशलक्ष लिटर्स असा एकूण १०९ दशलक्ष लिटर्सच्या केंद्रांमध्ये अपफ्लो अॅनारोबिक स्लज ब्लँकेट तंत्रज्ञान वापरले जाते.

शुध्द केलेले पाणी नदीत सोडल्यानंतर नदी पात्रात फेसाळयुक्त पाणी दिसते. त्यास युएएसबी रिॲक्टर हे तंत्रज्ञान कारणीभूत असल्याचा अहवाल पवई आयआयटीने दिला आहे.

कामकाजावर बोट

नमामी गोदा प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी महापालिकेने सल्लागार संस्था नियुक्त केली आहे तर मलनिस्सारण केंद्रांच्या सर्वेक्षणासाठी स्वतंत्र संस्था आहे.

एकच सल्लागार संस्था नियुक्त केल्यास भिन्न अहवाल प्राप्त होणार नसल्याचे सांगत मलनिस्सारण विभागाच्या कामकाजावर पवई आयआयटीकडून बोट ठेवण्यात आले आहे.

अस्तित्वातील मलनिस्सारण केंद्रांची क्षमता (दशलक्ष लिटर)

- तपोवन १३०

- चेहेडी ४२

- पिंपळगाव खांब ३४

- टाकळी एक- ७२

- टाकळी दोन- ४०

- गंगापूर- १८

- पंचक- ६०

NMC News
NMC News : नाशिक महापालिका मुख्यालयात पालकमंत्र्यांचे कार्यालय; नागरिकांच्या समस्या सोडविणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.