बेकायदा जनावर वाहतूक रोखली; ट्रकसह २० लाखांची मुद्देमाल जप्त

illegal animal trafficking Stopped Property worth Rs 20 lakh seized along with truck Nashik News
illegal animal trafficking Stopped Property worth Rs 20 lakh seized along with truck Nashik Newsesakal
Updated on

जायखेडा (जि. नाशिक) : ट्रकमधून बेकायदा १६ गोऱ्हे व २ गायींची वाहतूक जायखेडा पोलिसांनी रोखली आहे. ट्रकसह १९ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चालकास अटक केली आहे. जायखेडा- ताहाराबाद रस्त्यावर शनिवारी (ता. १६) सकाळी दहाच्या सुमारास जायखेडा पोलिसांकडून कारवाई करण्यात आली.

ताहाराबादकडून मालेगावकडे १८ जनावरांना अमानुषपणे कोंबून घेऊन जाणारा ट्रक जात असल्याची माहिती जायखेडा पोलिसांना मिळाली. सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी व त्यांच्या पथकाने सापळा लावला. त्यात संशयित ट्रक (क्र. एमएच- ४३- यू- ५३८९) मालेगावकडे जात असताना पोलिसांनी चालकाला थांबविले. चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर ट्रकची तपासणी केली असता त्यात अमानुषपणे जनावरे कोंबलेली आढळून आली. पोलिसांनी १६ गोऱ्हे, २ गायींसह ट्रक असा १९ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ट्रकचालक अब्दुल मजीद मोहमद शाहिर (वय ३०, रा. मालेगाव) याला अटक केली आहे.

illegal animal trafficking Stopped Property worth Rs 20 lakh seized along with truck Nashik News
सप्तश्रृंगगड : किर्तीध्वजाच्या मिरवणूकीत खानदेशातून लोटला जनसागर

सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार राजेश सावळे, पोलिस हवालदार सुनील पाटील, दीपक भगत, पोलिस हवालदार जगताप, राऊत, पवार, होमगार्ड तुषार मोरे, राकेश नवसार यांनी कारवाई केली.

illegal animal trafficking Stopped Property worth Rs 20 lakh seized along with truck Nashik News
ग्रामपंचायतीच्या आवारातच अंत्यविधी; प्रशासनाचा बेजबाबदारपणा चव्हाट्यावर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.