ब्रम्हगिरी कृती दलातर्फे अवैध उत्खननाला ‘ब्रेक’; जेसीबी ताब्यात

brahmagiri
brahmagiri Sakal
Updated on

नाशिक : ब्रह्मगिरीवरील अवैध उत्खनन रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कृती दलाची स्थापना केली, तर दुसरीकडे मात्र जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश धाब्यावर बसवून ब्रम्हगिरीनंतर भांगडी व संतोषा डोंगरावर अवैध उत्‍खनन होत असल्याचा प्रकार उघडकीस आला. रविवारी (ता.२७) पर्यावरणप्रेमींनी अवैध उत्खननाला प्रतिबंध करीत, ते बंद पाडले. (illegal bramhgiri mountain driling stopped by the brahmagiri action force)


ब्रह्मगिरी कृती समितीतर्फे हॅशटॅग चिपको, नाशिक व उत्तुंग झेप फाउंडेशनच्या ५० कार्यकर्त्यांनी भांगडी व संतोषा डोंगर परिसरातील अवैध उत्खननाला प्रतिबंध केला. रोहन देशपांडे, शेतकरी दत्तू ढगे आदींसह कार्यकर्त्यानी अवैध उत्खननाला प्रतिबंध केला. ढगे यांनी उत्खननासाठी स्फोट घडविले जातात तो दुर्गम भाग पर्वतरांगा व घनदाट झाडीमुळे दिसत नाही. तेथे जिलेटीन बॉक्स व खोदकामाचे इतर साहित्य आढळल्याचा आरोप केला. भांगडी - संतोषा डोंगर परिसरात सागवानाचे घनदाट जंगल आहे. तरीही तेथे डोंगर पोखरून जंगल ओरबडण्याचे काम होत आहे. संबंधित यंत्रणा त्याकडे दुर्लक्ष केले जाते, अशा तक्रारी केल्या. दरम्यान, उपजिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी घटनास्थळी दाखल होत दोन जेसीबी ताब्यात घेतले. पंचनामा केला. दरम्यान, याप्रश्नी पर्यावरणमंत्री उद्धव ठाकरे यांना ब्रह्मगिरी, भांगडी व संतोषा परिसरात पाहणीचे दौरा करण्याचे निमंत्रण देऊन संबंधितांवर कडक कारवाईसह नुकसान भरपाई वसुलीचे सर्व विभागांना निर्देश देण्यात यावेत, असे निवेदन देण्यात येईल.

brahmagiri
नाशिकमध्ये महापालिका लसीकरण केंद्रावर वशिलेबाजी


ब्रह्मगिरी बचावासाठी आंदोलन केले. कोरोनाचे कारण पुढे करून आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला. कोणतेही अवैध उत्खनन होऊ देणार नाही.
- शांताराम महाराज दुसाने, अध्यक्ष, वारकरी साहित्य परिषद.

डोंगर भुईसपाट करण्याचे गैरप्रकार सुरू असून, अशा गैरकृत्यांविरोधात जनतेचा दबाव वाढला पाहिजे.
- प्रशांत परदेशी, पर्यावरणप्रेमी.

खासगी भागात उभा डोंगर कापण्यासाठी जिलेटीन कुठून मिळवले जाते? याचाही कसून तपास झाला पाहिजे.
- प्रकाश निकम, पर्यावरणप्रेमी.

(illegal bramhgiri mountain driling stopped by the brahmagiri action force)

brahmagiri
महाराष्ट्राचे ‘भरतपूर' नांदुरमध्यमेश्वरला कमळांचा साज!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.