Nashik Crime Rate : शहरात राजरोस सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरुद्ध पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी धडक कारवाईचा बडगा उगारला आहे. तरीही गेल्या सहा महिन्यात अवैध मद्यविक्रीचे २१४ तर, मटका- जुगाराचे ७० असे पावणेतीनशे गुन्हे दाखल झाले असून, सुमारे ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
त्यामुळे शहरात ‘अज्ञाता’ च्या पाठबळामुळे चोरीछुपे सुरू असलेल्या अवैध धंद्यांना अद्यापही आळा बसू शकलेला नाही. याबाबत आयुक्तांना पोलिस ठाण्याकडे करडी नजर करावी लागणार आहे. (Illegal businesses in city not curbed three hundred crimes in 6 months 35 lakhs worth of goods seized nashik)
पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी गेल्या डिसेंबर महिन्यात पदभार घेतला होता. आयुक्तांनी सुरवातीपासूनच शहरातील गुन्हेगारीविरोधात कठोर भूमिका घेत धडक कारवाई सुरू केली. अवैध धंद्यांना आळा बसण्यासाठी आयुक्तांनी शहर गुन्हे शाखेअंतर्गत स्वतंत्र पथके तयार केली.
तसेच, पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्याचे आदेश देत कारवाई करून गुन्हे दाखल करण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे राजरोस सुरू असलेल्या अवैध धंद्यांना आळा बसला असला तरीही लपूनछपून अवैधरीत्या मद्याची विक्री, जुगार- मटक्याचे अड्डे सुरूच आहेत.
आयुक्तांच्या आदेशानुसार पोलिसांनी कारवाई करीत, गेल्या सहा महिन्यात अवैध मद्यविक्रीचे २१४ गुन्हे दाखल केले असून, सुमारे ३२ लाखांचा अवैध मद्याचा मुद्देमालही जप्त केला आहे.
तर, ७० अवैधरीत्या सुरू असलेल्या मटका-जुगार अड्ड्यांवर छापे टाकून, १९२ जुगाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे. एकीकडे पोलिसांकडून धडक कारवाई सुरू असताना, दुसरीकडे चोरीछुप्यारीतीने अवैध धंदे सुरू आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
जरब कशी बसेल?
पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्यांची माहिती असतानाही त्याकडे सोईस्कर डोळेझाक केली जाते. यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांना छुपे बळच मिळते.
अवैध धंद्यांविरोधात धडक कारवाई करतानाच, त्यांना पाठबळ देणाऱ्यांवरही कारवाई केली तरच अवैध व्यवसायावर जरब बसू शकेल. त्यासाठी आयुक्तांनी पोलिस ठाण्यांवरही करडी नजर ठेवावी, अशी चर्चा पोलिस वर्तुळात आहे.
सहा महिन्यातील कारवाई
अवैध धंदे......... दाखल गुन्हे.........अटक संशयित........जप्त मुद्देमाल
अवैध मद्यव्रिकी .....२१४............१३४........३२,०३,८०९ रु.
मटका/जुगार......७०......१९२.......५,२१,६१४ रु.
"अवैध धंद्यांविरुद्ध धडक कारवाईचे पोलिस आयुक्तांचे आदेश आहेत. त्यानुसार शहर गुन्हे शाखा आणि पोलिस ठाणेनिहाय कारवाई केली जाते. नागरिकांनीही पोलिसांना अवैध धंद्यांबाबत माहिती द्यावी. पोलिसांकडून कारवाई केली जाईल."
- प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त, शहर गुन्हे शाखा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.