Nashik Crime News: अवैध सावकारांची पोलिसांनाच धमकी! सातपूर पोलिसांकडूनही आयुक्तांकडे जाण्याचा सल्ला

Nashik Crime News
Nashik Crime Newsesakal
Updated on

नाशिक : सातपूरच्या अशोकनगरमधील अवैध सावकारीतून एकाच कुटुंबातील तब्बल तीन जणांनी आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर सहनिबंधक विभागानेही सातपूरमधील शिवसेनेचे पदाधिकारी व त्याचा भाऊ यांच्या घरावर छापे टाकून अनेक महत्त्वाच्या फाइल जप्त केल्या.

पण, या प्रकरणात कारवाई करणाऱ्या पथकाबरोबर आलेल्या पोलिसांनाच या दोन्ही भावांनी धमकी दिल्याचा प्रकार आज समोर आला. (Illegal lenders threaten police Advice from Satpur Police to go to Commissioner Nashik News)

अशोकनगरमधील शिरोडे कुटुंबातील बाप व दोन मुलांनी अवैध सावकारांमार्फत लाखो रुपयांच्या वसुलीचा तगादा लावल्याने राहत्या घरातच वेगवेगळ्या खोल्यांमध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती.

त्यानंतर पोलिसांनी कारवाई करण्याच्या दृष्टीने पावलं उचलत सहकार विभागाकडूनही ज्या परवानाधारक व अवैध सावकारांविरुद्ध तक्रारी आल्या असतील, अशा सर्वांची माहिती मागविली होती. याबाबतचे पत्र मिळताच सहकार विभागाने तीन भरारी पथक निर्माण करत सातपूर, कामगारनगर, सिडको आदी ठिकाणी छापे टाकले.

या पथकांबरोबर संरक्षणासाठी पोलिस कर्मचारीही उपस्थित होते. त्यात महिंद्र सर्कलशेजारी ओम हार्डवेअर असलेल्या इमारतीत शिवसेनेचा पदाधिकारी व त्याचा ठेकेदार भाऊ यांच्या कार्यालयावर व घरावर या पथकाने दिवसभर तपासणी केली.

यात मोठ्या प्रमाणावर जमिनींची कागदपत्रे व काही फाइल जप्त करत असताना पथकासोबत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला मात्र या अवैध सावकाराने अडथळा आणण्याचा प्रयत्न केला.

Nashik Crime News
Nashik Bribe Crime : बारचालकांकडून हप्ते वसुली करताना एक्साईजचे तिघे लाचखोर जेरबंद

सातपूरला तक्रार नाही घेतली

कारवाई संपल्यानंतर या पोलिस कर्मचाऱ्याला खोट्या तक्रारी देऊन तुझ्याविरोधात गुन्हा दाखल करत अडकविण्याबाबतही धमक्या दिल्याचा प्रकार समोर आला. याबाबत संबंधित पोलिस कर्मचाऱ्याने सातपूर पोलिस ठाण्यात येऊन कैफियत मांडत संबंधितांविरोधात तक्रार देण्याचा प्रयत्न केला.

मात्र, सातपूर पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार देत पोलिस आयुक्ताकडे तक्रार देण्याचा सल्ला दिल्याची कैफियत या कर्मचाऱ्यानी पत्रकारांपुढे मांडली.

आयुक्त पोलिसाला न्याय देतील

विशेष म्हणजे या अवैध सावकार व ठेकेदाराला वाचविण्यासाठी सहकार विभागातील अधिकाऱ्यांना नगरसेवकांसह अनेक बड्या राजकीय नेत्यांनी फोन केल्याचेही बोलले जात आहे. यावरून अवैध सावकारांची एवढी दहशत असेल आणि पोलिस कर्मचारीच हतबल असतील, तिथे सर्वसामान्यांचे काय? हा सवाल औद्योगिक कामगारनगरीत उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

Nashik Crime News
Nashik News : विनय नगर येथील अतिक्रमित पक्की बांधकामे तोडण्याचे काम सुरू; 7 बंगले तोडले

पोलिस आयुक्त या मुजोर अवैध सावकारांवर कारवाई करतील का? तसेच पोलिस कर्मचाऱ्यांना न्याय देतील का? यांसारखे प्रश्‍न उपस्थित होत आहेत.

पुन्हा पूर्वीचाच कित्ता

याच ठेकेदार व सावकाराचे कंत्राट असलेल्या कामगारांच्या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी गेलेल्या कामगार उपआयुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्याच्या विरोधात खोट्या तक्रारी देऊन त्या दिव्यांग कर्मचाऱ्याला अडकविण्याचा प्रकारही केला होता. आता पुन्हा तोच कित्ता गिरवत थेट पोलिसांनाच अडकवत असल्याचे बोलले जात आहे.

Nashik Crime News
Nashik News : ZP समाजकल्याण अतंर्गत मागासवर्गीय 80 लाभार्थ्यांना चारचाकी!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.