Nashik Crime News: ओझरला 18 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

शनिवारी नाशिक-मुंबई महामार्गावरील दहावा मैल परिसरात ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत १८ लाखांचा मद्यसाठा जप्त केला आहे
Illegal liquor stocks worth 18 lakh seized from Ozar nashik crime news
Illegal liquor stocks worth 18 lakh seized from Ozar nashik crime news
Updated on

ओझर : थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्य तस्करी फोफावली असून, दिंडोरी तालुक्यात दोन दिवसांपूर्वीच झालेल्या कारवाईपाठोपाठ शनिवारी नाशिक-मुंबई महामार्गावरील दहावा मैल परिसरात ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत १८ लाखांचा मद्यसाठा जप्त केला आहे. (Illegal liquor stocks worth 18 lakh seized from Ozar nashik crime news)

जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशानुसार अवैध तस्करी रोखण्यासाठी स्थापन केलेल्या विशेष पथकाने स्थानिक शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. यात नाशिककडे जाणारा कंटेनर (एनएच ०१-एन- ७६३०) पथकाने थांबवत झडती घेतली असता त्यात विदेशी मद्याचे एकूण ५७१ बॉक्स असा एकूण १८ लाख ३२ हजार ९६४ रुपये किमतीचा अवैध मद्यसाठा मिळून आला.

हे मद्य पंजाब राज्याव्यतिरिक्त इतर राज्यांमध्ये विक्री करण्यास मनाई असूनदेखील यातील संशयिताने बनावट इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे बिल तयार करून, शासनाचा महसूल चुकवून अवैधरीत्या विक्रीसाठी आणल्याचे समोर आले.

Illegal liquor stocks worth 18 lakh seized from Ozar nashik crime news
Nashik Crime News: फायनान्शियल सर्व्हिसेस कार्यालयावर गुन्हे शाखेचा छापा

दरम्यान, कंटेनर मालक मोहन कनारामलाल (रा. दांतीवास, जि. जालोर, राजस्थान) फरार झाला आहे. या प्रकरणी ओझर पोलिस ठाण्यात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत एकूण १८ लाख ३२ हजार ९६४ रुपयांचा मद्यसाठा व कंटेनर, असा एकूण ३८ लाख ३२ हजार ९६४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक पोलिस निरीक्षक सागर कोते, सहायक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे, पोलिस उपनिरीक्षक दत्ता कांभीरे, नाना शिरोळे, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ठोंबरे, नवनाथ सानप, शांताराम घुगे, सतीश जगताप, मनोज सानप यांच्या पथकाने केली.

Illegal liquor stocks worth 18 lakh seized from Ozar nashik crime news
Nashik Crime News: बॅंक काॅलनीत सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न अयशस्वी; हल्लेखोर अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.