Nashik Crime: हावडा- सीएसएमटी रेल्वेत सर्रास गुटखा विक्री

Illegal sale of Gutkha in Howrah-CSMT Railway.
Illegal sale of Gutkha in Howrah-CSMT Railway.esakal
Updated on

Nashik Crime : गुटखाबंदी असताना ठिकठिकाणी गुटखा चहासारखा विकला जात आहे. पानटपऱ्यांसह लोक घरांमधून अवैध गुटखा विक्री करीत आहे. हा गुटखा येतो कुठून, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

(गाडी नंबर १२३२१) हावडा- सीएसएमटी रेल्वेगाडीमध्ये सध्या अवैध गुटख्याची मोठ्या प्रमाणावर सर्रास विक्री केली जाते. (illegal sale of Gutkha in Howrah CSMT Railway Nashik Crime)

नाशिक ते इगतपुरी दरम्यान गुटखा विक्री जोमाने होते. तसेच, पुढे कसारा ते थेट मुंबईच्या स्टेशनपर्यंत गुटखा विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

रेल्वेने या गुटखा विक्री करणाऱ्या लोकांवर नजर ठेवायला हवी व कारवाई करायला हवी, अशी मागणी प्रवासी करीत आहे. शिवाय हा गुटखा आरोग्याला हानिकारक असूनही हावडाकडून येणारे प्रवासी या गुटख्याच्या पुड्या घेतात आणि खाऊन कुठेही थुंकतात.

रेल्वे गाडी खराब करतात. रेल्वेतून इतरांच्या अंगावरही थुंकी उडते. रेल्वे पोलिस आणि आरपीएफच्या ही गोष्ट लक्षात येऊनही ते दुर्लक्ष करीत आहे, असा निर्वाळा सध्या प्रवासी काढत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Illegal sale of Gutkha in Howrah-CSMT Railway.
Dhule Crime : फियाट कारमधून मद्यतस्करी; सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त

भुसावळ हे जंक्शन असल्यामुळे भुसावळ येथून इतर राज्यांमध्ये गाड्या मार्गक्रमण करीत असतात. अनेक वेळा गीतांजली एक्स्प्रेससह इतर गार्डनमध्ये भुसावळ स्टेशनवरूनच अवैधरीत्या गुटखा विक्री होते.

हे अवैध गुटखा विक्रेते लहान स्टेशनवर चढतात. गुटखा विक्री करून चालत्या गाडीत उतरतात. अनेक वेळा रेल्वे स्टेशनवर हे गुटखा विक्रेते येत नाही. गुटखा विक्रीला भुसावळपासून सुरवात होते, असे अनेक प्रवाशांनी सांगितले आहे.

Illegal sale of Gutkha in Howrah-CSMT Railway.
Crime News: मुलीशी लग्न करायचं होतं! लिंग बदलण्यासाठी तांत्रिकाकडे गेली अन्...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.