नाशिक : अवैध मद्याची विक्री केली जात असल्याप्रकरणी अंबड व देवळाली कॅम्प पोलिसांनी छापा टाकून तिघा विक्रेत्यांना अटक केली. चार हजारांचा मद्यसाठा जप्त केला असून, याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Illegal sale of liquor in city Three arrested Nashik Crime News)
संशयित वाल्मीक अभिमन्यू केदार (रा. मोरवाडी) हा मंगळवारी (ता. १०) रात्री पंडितनगरमधील काळे मामा गिरणी भागात अवैधरीत्या देशी दारूची विक्री करीत होता. पोलिसांनी छापा टाकून १ हजार १९० रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या.
तसेच, संशयित अजय उद्धव कणकुटे (रा. इंदिरा गांधी वसाहत) हा मंगळवारी रात्री महालक्ष्मी किराणासमोर उघड्यावर अवैधरीत्या दारू विक्री करताना पोलिसांना आढळून आला. त्याच्या ताब्यातून ६६५ रुपये किमतीच्या १९ दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. या दोन्ही प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तर, देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याच्या हद्दीत संशयित शुभम सुकदेव तनपुरे (रा. वडगाव पिंगळा, ता. सिन्नर) हा मंगळवारी (ता. १०) सायंकाळी भगूर लहवित रोडवरील हॉटेल रायबाच्या भिंतीलगत अवैधरीत्या मद्याची विक्री करीत होता.
पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून २ हजार २२० रुपये किमतीच्या बिअरच्या १२ बाटल्या जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.