ट्रकमध्ये कोंबून जनावरांची बेकायदा वाहतूक; ट्रकचालक, मालक गजाआड

Illegal transportation of animals
Illegal transportation of animalsesakal
Updated on

जायखेडा (जि. नाशिक) : १६ गाई व ४ गोऱ्हे अशा एकूण २० जनावरांची बेकायदा वाहतूक करताना ट्रकसह सोळा लाख ३० हजारांचा मुद्देमाल जायखेडा पोलिसांनी जप्त केला. ट्रकचालक, मालक व त्यांच्या साथीदारास अटक करण्यात आली आहे. कातरवेल गावाजवळ रविवारी (ता. ६) सकाळी साडेनऊच्या सुमारास सदर कारवाई करण्यात आली.

पिंपळनेरकडून मालेगावकडे २० जनावरांना ट्रकमध्ये अमानुषपणे कोंबून घेऊन जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून जायखेड्याचे (Jaikheda) सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, पोलिस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ व त्यांच्या पथकाने सापळा लावला. त्यात संशयित ट्रक (क्र. MH- 41- AU- 1703) मालेगावकडे जात असताना पोलिसांनी चालकाला थांबण्याचा इशारा केला. परंतु, चालकाने ट्रक पळविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सिनेस्टाइल पाठलाग करत कातरवेलजवळ ट्रक पकडला.

Illegal transportation of animals
नाशिक जिल्ह्यात यंदा कांद्याचे बंपर पिक; 2 लाख हेक्टरवर विक्रमी लागवड

या वेळी पोलिसांनी १६ गाई व ४ गोऱ्हे आणि ट्रक असा एकूण 16 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ट्रकचालक व मालक अल्ताब अहमद शब्बीर अहमद (वय ३५, रा. हसनपुरा, मालेगाव), शेख शाहिद शेख रशीद (वय २३, रा. इस्लामपुरा मालेगाव) या दोघांना पोलिसांनी अटक केली. जखमी जनावरांवर खासगी पशुवैद्यक (veterinarian) डॉ. कपिल अहिरे यांनी उपचार केले. गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी चारा व पाण्याची व्यवस्था केली.

Illegal transportation of animals
ओबीसी विधेयकावरुन हरिभाऊ राठोडांची सरकार, विरोधकांवर सडकून टीका

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, पोलिस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार राजेश सावळे, दीपक भगत, पोलिस हवालदार जगताप, पोलिस हवालदार राऊत, पोलिस हवालदार बावरी, होमगार्ड चतुर सोनवणे, अंकित घरटे, तुषार मोरे, राकेश नवसार यांनी ही कारवाई केली.

Illegal transportation of animals
कांद्यावरील अळीमुळे बळीराजा चिंतातूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()