नाशिक : परराज्यातील विदेशी मद्याची (foreign liquor) अवैधरीत्या वाहतूक करताना कारसह सुमारे ११ लाखांचा दारूचा साठा जप्त करण्यात आला. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबोली चेक पोस्टवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने (State Excise Department) सदरची कारवाई केली. या वेळी दोघांना अटक करण्यात आली आहे. (Illegal transportation of foreign liquor 11 lakh liquor seized along with car nashik crime news)
संशयित वाहनचालक योगेश्वर ऊर्फ योग नथूभाई पटेल (वय ३१, रा. नानापुंडा, ता. कपराडा, जि. वलसाड, गुजरात), सुभाष विकीभाई नलिसा (२७, रा. ओझर, ता. जि. वलसाड, गुजरात) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात चेक पोस्ट असून, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबोली येथील चेक पोस्टवरून अवैध मद्याची वाहतूक होणार असल्याची खबर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकास मिळाली होती.
त्यानुसार, पथकाने रविवारी (ता. १९) अंबोली चेक पोस्ट येथे सापळा रचला होता. खबरीनुसार पथकाने संशयित कारची (एमएच ०४, ईएक्स ६४२०) तपासणी केली असता, या कारच्या डिकीत व मागील सीटवर दादरा- नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात विक्रीसाठी आणि महाराष्ट्रात प्रतिबंधित विदेशी मद्याचा साठा मिळून आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपआयुक्त अर्जुन ओहोळ, जिल्हा अधीक्षक शशिकांत गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ब’ विभागाचे निरीक्षक एस. एस. देशमुख, प्रवीण ठाकूर, एम. आर. तेलंगे, एच. एस. नेहेरे, जवान विजेंद्र चव्हाण, विष्णू सानप, रमाकांत मुंढे, किरण कदम, गोकुळ परदेशी यांनी केली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.