Nashik News: IMAचा वृद्धांना आधार...!; म्‍हसरुळला TB सॅनिटोरियमच्‍या जागेत वृद्धाश्रम

Old age people
Old age peopleesakal
Updated on

नाशिक : उतार वयात ज्‍येष्ठांना विविध कारणांमुळे अपेक्षित आधार मिळत नाही. समाजातील अशा ज्येष्ठांना आधार देण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) नाशिक शाखेतर्फे वृद्धाश्रम कार्यान्‍वित केले आहे. म्‍हसरुळ येथील संघटनेच्‍या जागेतील टीबी सॅनिटोरियम प्रांगणात वृद्धाश्रम सुरु केले आहे. त्या माध्यमातून ज्‍येष्ठ नागरिकांना आधार देत डॉक्‍टरांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. (IMA support for elder Old age home on premises of TB Sanatorium at Mhasrul Nashik Latest Marathi News)

कोरोना महामारीच्‍या काळात बाधितांवर उपचारासाठी येथील इमारत उपलब्‍ध करून दिली होती. नंतरच्‍या कालावधीत या इमारतीचा वापर वृद्धाश्रमासाठी करण्याचे निश्‍चित करण्यात आले. त्‍यानुसार ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्‍वावर इथे वृद्धाश्रम सुरु केले आहे. कुठल्‍याही औपचारिक सोहळ्यात न अडकता लागलीच वृद्धाश्रम सुरु करत ज्‍येष्ठांना हक्‍काचा निवारा उपलब्‍ध करून दिला आहे.

सद्य:स्‍थितीत येथे दोन स्‍वतंत्र खोल्‍या तसेच, पुरुष व महिलांसाठी प्रत्‍येकी चार क्षमता असे दहा वृद्धांसाठीची सुविधा उपलब्‍ध आहे. टीबी सॅनिटोरियम येथील कर्मचारी ज्‍येष्ठांच्‍या काळजीसाठी नेहमी तत्‍पर असतात. त्यात प्रामुख्याने वैद्यकीय अधीक्षक डॉ. गौरी कुलकर्णी यांच्‍यासह डॉ. किशोर गांगुर्डे, डॉ. गायखे, डॉ. सुषमा दुगड नियमित आरोग्‍य तपासणीसाठी भेट देतात. टीबी सॅनिटोरीयमचे विश्वस्‍त मंडळातील डॉ. राजश्री पाटील, डॉ. विशाल पवार, डॉ. समीर पवार, डॉ. प्रशांत देवरे, डॉ. विशाल गुंजाळ, डॉ. नितीन हिरे, डॉ. किशोर गांगुर्डे, डॉ. शिरीष देशपांडे यांचे सहकार्य लाभते आहे.

हेही वाचा : ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

Old age people
Onion News : येवल्यात लाल कांद्याला 1600 रुपयांचा भाव; शेतकऱ्यांमध्ये नाराजी

भविष्यात साकारणार ‘हॉसस्‍पाईस’

दुर्धर आजाराने ग्रस्‍त व्‍यक्‍तींचा सांभाळ करण्यासाठी ‘हॉसस्‍पाईस’ (सेवा सदन) अथवा ‘पॅलिएटीव्‍ह केअर’ यासारख्या संकल्‍पना पुढे आल्या आहेत. याच धर्तीवर आयएमएशी संलग्‍न नाशिकमधील पहिले ‘हॉसस्‍पाईस’ सुरु करण्याचा मानस पदाधिकाऱ्यांचा आहे. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असताना डॉक्‍टरांची संघटना म्‍हणून सामाजिक बांधिलकी जपण्याचा या माध्यमातून प्रयत्‍न केला जात असल्‍याचे सांगण्यात आले.

ज्येष्ठांच्या सेवेचा फायदा

अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविन:।

चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलं।।

हा संस्‍कृतमधील श्‍लोक. अर्थात, ज्‍येष्ठ नागरिक, वृद्धांच्‍या सेवेचे महत्त्व विशद केलेले आहे. त्‍यानुसार ज्‍येष्ठांना अभिवादन करणारे व्‍यक्‍ती आणि नियमित वृद्धांची सेवा करणारे व्‍यक्तींचे आयुष्य, विद्या, यश आणि बल हे नेहमी वृद्धींगत होत राहाते.

"टीबी सॅनिटोरियमच्‍या जागेत आयएमएच्‍या माध्यमातून वृद्धाश्रम सुरु केले असून, गरजूंनी सुविधेचा लाभ घ्यावा. संघटनेशी संलग्‍न तज्‍ज्ञ डॉक्‍टरांकडून नियमित सल्‍ला व मार्गदर्शन उपलब्‍ध असतो. भविष्यात येथे ‘हॉसस्‍पाईस’ सुरु करण्याचा मानस आहे."

-डॉ.राजश्री पाटील (अध्यक्षा आयएमए)

Old age people
Nashik News : अपुऱ्या बससेवेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह प्रवाशांची परवड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.