Nashik : 1008 बेलाच्या पानांचा वापर करून साकारली महादेवाची प्रतिमा

An image of Mahadev created by Santosh Raul using bela leaves
An image of Mahadev created by Santosh Raul using bela leavesesakal
Updated on

येवला (जि. नाशिक) : कुठलीही कला म्हणजे एक सर्जनशीलता. याच कलात्मक आविष्काराच्या जोरावर येथील चित्रकला शिक्षक व कलाकार संतोष राऊळ यांनी श्रावण सोमवारनिमित्त १००८ बेलाच्या पानांचा वापर करून महादेवाची प्रतिमा साकारली आहे. (Image of Lord Mahadev made using 1008 bel leaves Nashik Latest Marathi News)

An image of Mahadev created by Santosh Raul using bela leaves
Dhule : समस्या जाणल्या; ‘रिझल्ट’ दाखवा!

कलाकार आपली कलाकारी विविध माध्यमातून नेहमी साकारत असतो. अशाच प्रकारे संतोष राऊळ या कलाकाराने श्रावण महिनानिमित्त १००८ बेलाचे पाने आणून या सर्व बेलाच्या पानांना महादेवाचा आकार देऊन त्यावर कलर देऊन ध्यानस्थ महादेवाची अप्रतिम अशी प्रतिमा साकारली आहे.

मूर्तीच्या आजूबाजूलाही शेकडो बेलाचे पाने लावून त्यावर देखील महादेवाच्या विविध प्रतिमा, ओम नमः शिवाय, डमरू, त्रिशूल, असे सर्व महादेवाचे नावे व शस्त्र या कलाकाराने आपल्या हाताच्या साह्याने पानावर कलरच्या माध्यमातून रेखाटन करून साकारले आहे.

बेलाच्या पानांवर रंगांचा वापर करून श्री. राऊळ यांनी महादेवाची प्रतिमा साकारली असून, महादेवाच्या मूर्तीच्या आजूबाजूला बेलाचे पाने लावली आहेत. या बेलांच्या पानांवरही शिवशंभो, महादेवाच्या विविध प्रतिमा, नावे या कलाकाराने आपल्या हाताच्या साह्याने पेंट करून साकारली आहेत. हे करण्यासाठी त्यांना दोन दिवसांचा कालावधी लागला आहे.

An image of Mahadev created by Santosh Raul using bela leaves
Nagpanchami 2022 : चांदोरीला निघाली पारपरिक गवळी मिरवणूक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()