मनमाड स्थानकात शुकशुकाट; मुसळधार पावसाचा रेल्वे वेळपत्रकावर परिणाम

Manmad Railway Station Latest Marathi News
Manmad Railway Station Latest Marathi Newsesakal
Updated on

मनमाड (जि. नाशिक) : मुंबईसह राज्यात सर्वत्र पावसाने (Heavy Rain) दमदार हजेरी लावली आहे. याचाच परिणाम मध्य रेल्वेच्या (Railway) रेल्वे वाहतुकीवर देखील झाला आहे. बुधवारी भुसावळहुन मुंबईकडे जाणाऱ्या आणि मुंबईकडून मनमाडमार्गे भुसावळकडे जाणाऱ्या विविध रेल्वे प्रवासी गाड्या तब्बल चार ते पाच तास विलंबाने धावत असल्याने मनमाड रेल्वे जंक्शन (Manmad Railway Junction) स्थानकात प्रवाशांची गैरसोय झाली.

पावसामुळे स्थानकात शुकशुकाट जाणवत होता. तर महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या आगारातील सर्व बस वेळेत धावत आहे. (Impact of heavy rains on railway schedule Manmad Railway station Nashik Latest Marathi News)

Manmad Railway Station Latest Marathi News
Nashik : तीन वर्षांत 3 कोटी 64 लाख E-Passportची छपाई

राज्याच्या विविध भागातही पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. शिवाय संततधार पावसामुळे सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे दृश्यमानता ही कमी झाली आणि त्याचा मोठा फटका रेल्वे प्रवासाला बसत आहे.

गाडी क्रं. १५५४८- लोकमान्य टिळक टर्मिनस ते रक्सुल जंक्शन ३ तास उशिरा, गाडी क्रं. १२३३५ भागलपूर ते लोकमान्य टिळक टर्मिनस ३ तास उशिरा, गाडी क्रं. १५०१८ गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस ४ तास ४० मिनिट उशिरा, गाडी क्रं १२६२८ नवी दिल्ली ते बंगळुरु कर्नाटक एक्स्प्रेस १० तास ३० मिनिट उशिरा, गाडी क्रं. १२१६६ गोरखपूर लोकमान्य टिळक टर्मिनस रत्नागिरी एक्स्प्रेस ४० मिनटे उशिराने धावत आहे. मुंबईहून भुसावळकडे जाणाऱ्या, पुण्याहून ये- जा करणाऱ्या गाड्या देखील २० ते ३० मिनिटे उशिराने धावत आहेत.

Manmad Railway Station Latest Marathi News
सिलिंडर पोच केल्याचे मिळते कमिशन; सिलिंडर घेतानाच तपासणी करणे आवश्‍यक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.