नाशिक : ऑलिम्पिकमध्ये भारताला जास्तीत जास्त पदके मिळावी या हेतूने अर्थसंकल्पात क्रीडा क्षेत्रासाठी तब्बल ७२३ कोटी रुपयांची वाढीव तरतूद करण्यात आली आहे.
मात्र, खेळाडूंची वेळ आणि फिटनेसविषयी विचार करणाऱ्या स्पोर्ट सायन्ससाठी अवघी १३ कोटी रुपये इतकी अत्यल्प तरतूद केल्याने क्रीडा प्रशिक्षकांमध्ये नाराजी असल्याचे दिसून यते. (Impact of Union budget Anger due to only 13 crore provision for Sports Science nashik news)
खेळाडूंच्या दृष्टीने सेकंद किंवा मायक्रोसेकंदाचा वेळ महत्वाचा असतो. वेळ आणि खेळाडूंच्या तंदुरुस्तीवर अधिक संशोधन व्हावे यासाठी स्पोर्ट सायन्ससाठी केंद्र सरकार तरतूद करते. मात्र यात अवघे १३ कोटी रुपये दिल्यामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंविषयी संशोधनास मर्यादा येणार आहेत.
क्रीडा विभागासाठी एकूण केलेली वाढीव तरतूद ही अत्यंत सकारात्मक आहे. 'खेलो इंडिया' च्या माध्यमातून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दरवर्षी पार पडतात. १८ वर्षाआतील व विद्यार्थ्यांसाठी केलेली तरतूद ही खेळाडूंना प्रोत्साहन देणारी आहे. आगामी आशिया चॆम्पियनशिप स्पर्धांमध्ये संधी उपलब्ध होतील, असा अंदाजही प्रशिक्षकांनी वर्तवला आहे.
हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस
शालेय स्पर्धांना'ब्रेक'
‘साई’ या संस्थेमार्फत १४, १७ व १९ वर्षातील विद्यार्थ्यांच्या शालेय राष्ट्रीय स्पर्धा होतात. परंतु, कोरोनापासून बंद झालेल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह खेळाडूंचे नुकसान होत आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असले तरी केंद्र सरकारने या स्पर्धांमध्येही लक्ष घालण्याची मागणी होत आहे.
"ऑलिम्पिक स्पर्धा डोळ्यासमोर ठेवत केंद्र सरकारने बजेटमध्ये आवश्यक तरतूद केली आहे. त्यामुळे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला अधिक पदके मिळतील. नाशिकमधील दोन किंवा तीन खेळाडू स्पर्धेसाठी पात्र ठरण्याची शक्यता आहे."
- हेमंत पाटील, क्रीडा प्रशिक्षक, नाशिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.