Nashik : शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्यावर नाशिकची छाप

Ayodhya Shri Ram Temple
Ayodhya Shri Ram Templeesakal
Updated on

नाशिक : शिवसेनेने (Shiv sena) हिंदुत्व सोडलं आता भगवा सांभाळण्याची जबाबदारी आपली असल्याचे वारंवार वक्तव्य करून हिंदुत्वाच्या (Hindutva) मुद्द्यावर शिवसेनेला कोंडीत पकडणाऱ्या भाजपला (BJP) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत (Elections) याच मुद्द्यावर धोबीपछाड देण्याची तयारी अयोध्यावरून परतलेल्या शिवसैनिकांनी केली आहे. दरम्यान, शिवसेनेचा दुसरा अयोध्या दौरा यशस्वी करण्यात नाशिकचा वाटा साठ टक्क्यांहून अधिक असल्याने पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची दुसऱ्यांदा कौतुकाची थाप पाठीवर पडली. त्यामुळे हुरूप आलेले शिवसैनिक सुखावले आहेत. (Impression of Nashik citizens on Shiv Sena Ayodhya tour Nashik news)

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून सध्या राज्यात भाजप व शिवसेनेचे दावे- प्रतिदावे सुरू आहेत. शिवसेनेने हिंदुत्व सोडले या भाजपच्या प्रचाराला विरोधात शिवसेनेने दोन वर्षांपासून शिवसैनिकांसह अयोध्या वारी सुरू केली आहे. अयोध्येला शिवसैनिकांचा लवाजमा घेऊन जाणे अवघड असले तरी दोन दौरे यशस्वी झाले. अयोध्या दौऱ्याच्या यशस्वितेमागे नाशिकचे योगदान सर्वाधिक ठरले आहे. अयोध्येत पोचलेल्या शिवसैनिकांमध्ये नाशिकची टक्‍केवारी यंदाही सर्वाधिक राहिली. अयोध्येत जवळपास पाच हजार शिवसैनिक राज्यातून जमले होते. त्यात नाशिकच्या जवळपास दोन हजार शिवसैनिकांचा समावेश राहिला. चौदाशे शिवसैनिक विशेष रेल्वेने, तर उर्वरित शिवसैनिक विमान व रस्ते मार्गाने अयोध्येत पोचले. त्यामुळे यंदाही शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्यावर नाशिकचीच छाप राहिली. भाजपच्या सत्ताकाळात विकास झाला की नाही, हा मुद्दा निवडणुकीत महत्त्वाचा राहीलच. त्याशिवाय शिवसैनिकांकडून जय श्रीरामाचा नारादेखील दिला जाणार आहे. भाजपकडून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेला जेवढे डिवचले जाईल. तेवढ्याच गतीने भाजपला उत्तर देण्याची तयारी शिवसेनेने केली आहे.

मनसेलाही जशास तसे उत्तर

भाजप व शिवसेनेत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून दावे व प्रतिदावे सुरू असतानाच मनसेनेदेखील हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात घातला. मनसेकडूनही अयोध्या दौरा आयोजित केला गेला, मात्र स्थानिक साधू- महंतांनी राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध केला तर उद्धव ठाकरे यांचे मंत्राच्या जयघोषात स्वागत करताना शिवसेनेच्या हिंदुत्वावर शिक्कामोर्तब केल्याने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या मनसेची हवा पंक्चर झाल्याचे बोलले जात आहे.

"अयोध्येत राम लल्लाचे दर्शन घेतल्याने निवडणुकांमध्ये परिवर्तन अटळ राहणार आहे. उद्धव ठाकरे यांचे पाय अयोध्येला लागले, तेथेही परिवर्तन झाले. अयोध्या विकासासाठी सरकारला आठ हजार कोटींचे पॅकेज जाहीर करावे लागले. हिंदुत्वाचा वापर प्रचारासाठी करणे हे शिवसैनिकांच्या रक्तात नाही. आमचे हिंदुत्व स्वभावात रक्तात व कृतीत आहे. जेव्हा वेळ येते तेव्हा शिवसैनिक योग्य पद्धतीने हिंदुत्व दाखवितात. यंदाच्या निवडणुकीतही दाखवून देऊ."

- सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख शिवसेना

Ayodhya Shri Ram Temple
Nashik : आंदोलनाला कार्यकर्ती, उमेदवारी मात्र घरच्यांना

"हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपची कायम सोयीची भूमिका राहिली आहे. खरे हिंदुत्व शिवसेनेचेच असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले, मात्र भाजपकडून शिवसेनेच्या हिंदुत्वावर चुकीच्या पद्धतीने शंका उपस्थित करून संभ्रम निर्माण केला जात आहे. परंतु, अयोध्येतील साधू- संतांनी शिवसेनेच्या हिंदुत्वावर शिक्कामोर्तब केल्याने आता कोणाच्या प्रमाणपत्राची गरज राहिली नाही."

- अजय बोरस्ते, माजी विरोधी पक्षनेते.

Ayodhya Shri Ram Temple
पुणे विद्यापीठाच्या संघात नाशिकच्या अष्टपैलू रसिकाची निवड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.