कांदा दोन हजार पार; आवक वाढली

onion price
onion priceesakal
Updated on

येवला (जि.नाशिक) : सप्ताहात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येवला व अंदरसूल आवारात उन्हाळ कांदा आवक टिकून आहे. तर बाजारभावात थोडीशी सुधारणा झाली. येथे 2 हजार 170 रुपयांपर्यंत सर्वोच्च दर मिळाला. दरात सुधारणा होत असल्याने आवकेत काहीशी वाढ होत आहे. (Improving-onion-market-prices-in-Yeola-and-Andarsul-nashik-marathi-news)

येवला व अंदरसूलला बाजारभावात सुधारणा

कांद्यास देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, दिल्ली, पंजाब, राजस्थान, पश्‍चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आदी राज्यांत व परदेशात मागणी सर्वसाधारण होती. सप्ताहात उन्हाळ कांदा आवक ५५ हजार ३२१ क्विंटल झाली. तर बाजारभाव ४०० ते दोन हजार १७०, सरासरी एक हजार ७५० रुपये प्रतिक्विटलपर्यंत होते. उपबाजार अंदरसूल येथे आवक ३५ हजार ९७९ क्विंटल झाली. बाजारभाव ३०० ते कमाल दोन हजार १४२, तर सरासरी एक हजार ७०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते. गव्हाचे बाजारभाव एक हजार ५५० ते कमाल एक हजार ९७०, सरासरी एक हजार ७०० रुपयांपर्यंत होते. बाजारभाव एक हजार ३८० ते एक हजार ८५०, सरासरी एक हजार ४७५ रुपयांपर्यंत होते.

onion price
साहित्य संमेलनाची कागदपत्रे द्या; निमंत्रकांना अल्टिमेटम

हरभरा बाजारभाव तीन हजार ६९९ ते चार हजार ७७०, सरासरी चार हजार ५६० रुपयांपर्यंत होते. तुरीचे बाजारभाव तीन हजार ८०० ते पाच हजार ४५५ तर, सरासरी चार हजार ८०० रुपयांपर्यंत होते. सोयाबीनचे बाजारभाव पाच हजार एक ते सात हजार १७२, तर सरासरी सहा हजार ८०० रुपयांपर्यंत होते. मक्याची आवक १७७ क्विंटल झाली. बाजारभाव एक हजार ५५१ ते कमाल एक हजार ८३०, तर सरासरी एक हजार ७१७ रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते, अशी माहिती बाजार समितीचे सचिव के. आर. व्यापारे यांनी दिली.

onion price
इगतपुरीतील रिसॉर्ट..पावसाळा अन् पार्ट्यावरील छापे चर्चेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.