Geranium Farming: ‘जिरॅनियम’ शेतीमुळे शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा! नाशिक जिल्ह्यात लागवडीला प्राधान्य

Agriculture News : पारंपारिक पीक पद्धतीपेक्षा जिरॅनियम शेती हायटेक उत्पन्न देऊन शेतकऱ्याचे जीवनमान सुधारत आहे.
Geranium Farming
Geranium Farmingesakal
Updated on

नाशिक रोड : नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये शेतकरी जिरॅनियम शेतीला (Geranium Farming) प्राधान्य द्यायला देत असून, पारंपारिक पीक पद्धतीपेक्षा जिरॅनियम शेती हायटेक उत्पन्न देऊन शेतकऱ्याचे जीवनमान सुधारत आहे. (Improving standard of living of farmers due to Geranium farming Priority for cultivation in Nashik district marathi news)

जिरॅनियमपासून सुगंधी पदार्थांची निर्मिती केली जाते. औषध म्हणून चेहऱ्याला लावण्यासाठी जिरॅनियम हे द्रव्य हिऱ्यासमान समजले जाते. जिरॅनियमच्या तेलापासून अनेक सुगंधी पदार्थ बनवले जातात. औषधे, कॉस्मेटिक्स साबण आणि डिटर्जंट शाम्पू , सेंट , अगरबत्ती पावडर या वस्तू तयार केल्या जातात.

या वस्तूंना बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. काढणीनंतर उरलेल्या पालापाचोळ्यापासून खत निर्मिती करता येते. त्यामुळे एका पिकात अनेक उत्पन्न शेतकऱ्यांना घेता आल्यामुळे जिरॅनियम ची शेती म्हणजे एका पिकातून अनेक उद्योग साधले जात आहे यातून शेतकऱ्यांना भरघोस असा पैसाही मिळत आहे.

नाशिक विभागात नगर, धुळे, नाशिक काही प्रमाणावर नंदुरबार जिल्ह्यामध्ये जिरॅनियम शेती सध्या मोठ्या प्रमाणावर होत आहे. अनेक लहान- मोठ्या कन्सल्टन्सी जिरॅनियम शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना उद्युक्त करीत आहे. कमी खर्चात जास्त उत्पन्न आणि गुणवत्तापूर्ण शेतीला सध्या शेतकरी प्राधान्य देत असल्यामुळे येणाऱ्या काळात नाशिक जिल्हा जिरॅनियम हब झाल्यास आश्चर्य वाटू नये. (latest marathi news)

Geranium Farming
Nashik Agricultural Success: दुष्काळाशी 2 हात करीत फुलवली डाळिंबाची बाग! जळकू येथील शिंदे बंधुंचा प्रयोग यशस्वी

उत्पन्नात वाढ

साधारणपणे तीन वर्ष हे पीक शेतात राहणार असल्याने शेतीची मशागत करायला शेतकऱ्यांना खर्च येतो. एका एकरमध्ये १० हजार रोपे लागतात. लागवडीनंतर पहिल्यांदा हे पीक चार महिन्यानंतर कापणीला येते व त्यानंतर प्रत्येक तीन महिन्याला कापणीला येते. जिरॅनियम पीक एका वर्षात तीनवेळा कापणीला येते.

"जिरॅनियम शेतीला सध्या प्रचंड जागतिक मार्केट आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांची कनेक्टिव्हिटी डेव्हलप करून त्यांच्या कच्च्या मालाला जागतिक बाजारपेठ देण्यासाठी काम करीत आहोत. पारंपारिक पिकांपेक्षा सध्याच्या शेतकऱ्यांनी जिरॅनियमला प्राधान्य द्यावे म्हणून आम्ही शेतकऱ्यांना प्रशिक्षण देत आहोत."- प्रियांका केला , जिरॅनियम शेती उद्योजिका

"जिरॅनियम हे औषध आहे, त्यातून अनेक उद्योग उभे राहू शकतात. जिरॅनियमची लागवड मध्यम प्रतीच्या जमिनीवर आणि माळरानावरही करता येते. सर्वसाधारण २० ते ३४ अंश सेल्सिअस तापमानात हे पीक चांगले येते. शेतकऱ्यांनी हायटेक उद्योगाचा स्वीकार केल्यास उत्पन्न चांगलं मिळून शेतकऱ्यांना चांगला पैसा मिळू शकतो. शेतकऱ्यांना जिरॅनियम साक्षर करणे आवश्यक आहे. यातून एकंदरीत नाशिकची कृषी बळकट होऊ शकते."- तुषार वाघ. शेतकरी ,दिंडोरी

Geranium Farming
Nashik Agricultural Success: सदाबहार तैवान पेरूची शेती यशस्वी! पालखेड मिरची येथील शेतकऱ्याला एक एकरात 8 लाखांचा नफा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.