नाशिक : आदिवासी आयुक्तालयावर विद्यार्थ्यांच्या डीबीटी संदर्भात करण्यात आलेल्या उलगुलान आंदोलनानंतर स्वयंम डीबीटीचे ४ कोटी तर, वसतिगृहातील डीबीचे २६.४० कोटी विभागास प्राप्त झाले आहे.
सदर प्रस्तावाची फाइल जिल्हा कोशागारात सादर झाली असून आठवडाभरात विद्यार्थ्यांच्या खात्यात डीबीटीची रक्कम जमा होईल असा दावा विभागाच्यावतीने करण्यात आला आहे. (In 8 days to DBT tribal students account after Ulgulan Andolan nashik news)
आदिवासी विद्यार्थ्यांना पंडित दिनदयाळ योजना आणि वसतिगृह डीबीटी शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नसल्याने अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्यावतीने आदिवासी आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात आला होता.
या मोर्चात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. जोपर्यंत शिष्यवृत्ती आणि डीबीटीच्या संदर्भात ठोस निर्णय घेतला जात नाही, तोवर आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला होता.
याशिवाय आयुक्तालयाकडून दाद मिळाली नाही तर प्रसंगी आदिवासी विकास मंत्र्यांच्या दारापुढे आंदोलन करण्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली होती. या आंदोलनाची दखल घेत आदिवासी विभागाच्या सचिवांनी तातडीने यासंदर्भात निर्णय घेण्याचे जाहीर केले होते.
हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस
पंडित दिनदयाळ योजनेसाठी मंजूर असलेल्या निधीपैकी काही निधी तत्काळ मिळावा, यासाठीचा प्रस्ताव पाठविण्यात आल्यानंतर तीन कोटी ८० लाखांचा निधी प्राप्त झाला असून, हा निधी कोशागार कार्यालयात जमा झाला आहे.
वसतिगृह डीबीटीची आहारासाठी १९ कोटी, इतर खर्च ९ आणि साधन सामुग्रीसाठीची ३ अशी एकूण २६ कोटींची रक्कम आदिवासी विकास विभागाला प्राप्त झाली असून, ही रक्कमही कोशागारात जमा झालेली आहे. आदिवासी कार्यालयाकडून रक्कम कोशागारात जमा करण्यात आली असून, तेथून ती विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.