Nashik ZP News: जिल्हा परिषदेत मुख्यकार्यकारी अधिकारी यांची मर्जी संपादन करण्यासाठी अधिकाऱ्यांचे लाॅबिंग , ठराविक अधिका-यांस टार्गेट करणे, अधिकाऱ्यांमधील हेवे-दावे हे प्रकार कायम सुरू असतात. आताही असाच प्रकार जिल्हा परिषदेत घडला असून यात जिल्हा परिषदेतील अतंर्गत वादात महसूलची लाॅटरी लागली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल चारदिवसांच्या रजेवर जाणार असल्याने त्याकाळात प्रभारी मुख्यकार्यकारी अधिकारी पदाचा पदभार जिल्हा परिषदेतील पात्र अधिकाऱ्यांस मिळू नये यासाठी चलाखीने केलेल्या प्रस्तावाचा फायदा उचलत विभागीय आयुक्त कार्यालयाने त्यांच्याच कार्यालायीतल अप्पर आयुक्त निलेश सागर यांच्याकडे पदभार दिला आहे. (in absence of Chief Executive Officer charge was handed over to Revenue Officers nashik news)
यामुळे दोघांच्या भांडणात तिसऱ्यांचा लाभ म्हणीचा प्रत्यय आल्याची चर्चा आहे. दरम्यान, प्रभारी मुख्यकार्यकारी अधिकारी निलेश सागर मंगळवारी (ता.26) पदभार स्वीकारणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल पुढील आठवडयात रजेवर जात असून त्यांचा अर्जही प्राप्त झाला आहे. मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या अनुपस्थितीत हा पदभार अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे सोपविला जातो. अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी नसल्यास तो पदभार ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक यांच्याकडे दिला जातो. यापूर्वी याच पध्दतीने पदभार सोपविले गेले आहेत.
मात्र, आता जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांच्या अंतर्गत राजकारण झाले. यात, ग्रामीण विकास विभागातील अधिकाऱ्यांकडे पदभार देण्याऐवजी तो महसूल अधिकाऱ्यांकडे सोपविला गेला आहे.
मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या रजेच्या काळात त्यांचा तात्पुरता पदभार देण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने प्रस्ताव तयार करून तो विभागीय आयुक्त कार्यलयात पाठविला. त्या प्रस्तावात जिल्हा परिषदेतील पात्र अधिकाऱ्यांकडे इतर दोन पदभार असल्यामुळे त्यांच्याकडे पदभार देता येणार नसल्याचे स्पष्ट नमूद केले.
विभागीय आयुक्त कार्यलायतील समकक्ष अधिकाऱ्यांने स्वतःचे नाव समाविष्ट करून घेतल्याचे बोलले जात आहे. दरम्यान हा प्रस्ताव विभागीय आयुक्तांसमोर गेला असता त्यांनी त्यांच्या कार्यालयातील समकक्ष अधिकाऱ्यांकडे देखील दोन विभागांचा पदभार असल्याचे कारण सांगत, त्यांच्या नावावर फुली मारत अप्पर आयुक्त निलेश सागर यांच्याकडे पदभार सोपविला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.