Nashik : संगणकाच्या युगात रोजनिशीचे महत्त्व कायम

Diary Importance
Diary Importance esakal
Updated on

नाशिक : २१ व्या शतकात औद्योगिक क्रांती होऊन संगणकाचे, ऑनलाइन युग आले आहे. कोटींचा हिशोब मिनिटात होत आहे. हवी ती माहिती साध्या पद्धतीने संगणकामध्ये साठवणूक करता येते. असे असताना हिशोबाचा लेखाजोखा ठेवण्यासाठी ८० टक्के व्यावसायिक आजही रोजनिशीचा वापर करत आहे. त्यामुळे संगणकाचे युग असतानाही रोजनिशीचे महत्त्व टिकून आहे.

व्यावसायिकांनी आजही रोजनिशीवर जास्त विश्वास दाखविला आहे. संगणक असतानादेखील रोजनिशीमध्ये दैनंदिन माहिती, हिशेबाचा लेखाजोखा ठेवला जात आहे. गृहिणी घरगुती हिशोब ठेवण्यासाठीदेखील वापर करत आहे.

यासह दैनंदिन माहिती परिचित व्यक्तींचे नाव, फोन नंबर लिहून ठेवण्यानिमित्त फोन बुकचे काम करत आहे. तर काहींची श्रद्धा आहे म्हणून त्यांच्याकडून व्यवसायात, घरात रोजनिशी आणून ठेवली जात आहे.(In age of computers public like to use Daily Diary remain important Nashik News)

Diary Importance
Nashik Crime News : 2 कारमधून अवैध मद्याची वाहतूक

या सर्व बाबींचा विचार केला तर संगणक युगातदेखील रोजनिशीचे स्थान कायम आहे. औद्योगिक क्षेत्रात मात्र संगणकाचे जास्त महत्त्व आहे. त्यांच्याकडून जवळपास नाहीच्या प्रमाणात रोजनिशीचा वापर केला जातो. असे असले तरी ८० टक्के व्यापारी, व्यावसायिक रोजनिशीचाच वापर करत आहे. रोजनिशी वापरणाऱ्यांमध्ये छोट्या व्यावसायिकांचे सर्वाधिक प्रमाण आहे.

लक्ष्मीचे रूप

मोठ, मोठे व्यापारी लिखित व्यवहाराला अधिक महत्त्व देतात. त्यामुळे रोजनिशीवर विश्वासार्हता ठेवून त्यातदेखील संपूर्ण माहिती, हिशोब लिखित स्वरूपात साठा केला जातो. शिवाय अनेक जण त्यास लक्ष्मीचे रूप म्हणून वापरत असतात. छोटे व्यावसायिक, मंगल कार्यालय, लॉन्स, पुजारी, ब्युटीपार्लर, डॉक्टर यांच्याकडून प्री- प्लॅनिंग अर्थात भविष्यातील कामांचे नोंद ठेवण्यासाठी, तसेच बुकिंगसाठी वापर केला जातो. मुंबईमध्ये सर्वाधिक प्रमाणात उत्पादन होत असते. त्या पाठोपाठ अहमदाबाद, पुणे, नागपूर, नगर या ठिकाणी उत्पादन होऊन त्याची देशाच्या विविध भागात निर्यात होत असते.

५ रुपयांपासून ते १ हजारांपर्यंत दर

आधुनिकीकरणामुळे रोजनिशीच्या खरेदी- विक्रीवर काहीसा परिणाम झाला आहे. तरी आजही शहरात रोजनिशीचे मार्केट चांगले आहे. ७५ ते ८० टक्के मागणी होत असल्याने त्या प्रमाणात उत्पादन होऊन बाजारात विक्री होत असते. त्यामुळे आजही सर्वत्र रोजनिशी सहज दुकानांमध्ये नागरिकांना उपलब्ध होत असते. ५ रुपयांपासून ते १ हजार पाचशेपर्यंत दर आहे. पॉकेट डायरी स्वरूपापासून ते रजिस्टर स्वरूपातील रोजनिशी बाजारात उपलब्ध आहे.

या प्रकारात होते उपलब्ध

दिवाळी पाडवा ते दिवाळी

एप्रिल ते मार्च (आर्थिक वर्षांनुसार)

जानेवारी ते डिसेंबर (दिनदर्शिकेनुसार)

तारीख नसलेली रोजनिशी

Diary Importance
Forest Department Update : 5 लाख रुपये किंमतीचे सागवानी लाकूड वनविभागाकडून जप्त

"रोजनिशीचे मार्केट आजही चांगले आहे. कोणी श्रद्धेपोटी, कोणी दैनंदिन व्यवहारासाठी, तर कोणी केवळ लक्ष्मी रूपाने पूजेसाठी रोजनिशीची मागणी करत असतात."

- जानकीदास राठी, रोजनिशी विक्रेता

"संगणकामध्ये हिशेबाची नोंदणी ठेवणे घातक वाटत असते. इलेक्ट्रॉनिक वस्तू असल्याने कधीही ना दुरुस्त होऊन सर्व प्रकारची नोंदणी पुसली जाऊ शकते. रोजनिशीमध्ये मात्र लेखी स्वरूपात माहिती असल्याने ती भीती नसते."

- कल्पेश ठक्कर, दुकानदार

Diary Importance
Crime Update : लाचखोर इंजिनिअर अधिकारी LCBच्या ताब्यात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()